एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लघुशंकेवरुन वाद, पेट्रोलपंप चालकाचा हवेत गोळीबार

संशयित मुकुंद रामचंद्र यादव याला शाहुपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

कोल्हापूर : लघुशंका केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर कोल्हापुरात पेट्रोलपंप मालकाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित मुकुंद रामचंद्र यादव याला शाहुपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकवण्यासाठी हवेत गोळीबार केला. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे दाभोळकर कॉर्नर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दाभोळकर कॉर्नर परिसरातील पादचारी पुलाजवळ मुकुंद यादवचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री पेट्रोलपंपाजवळ एक प्रवासी लघुशंका करत होता. ते पाहून यादवचा भाचा सुनिल तळवडेने या प्रवाशाला हटकलं. त्यातून दोघांची वादावादी सुरु झाली. वादावादी ऐकून या ठिकाणी गर्दी जमली. त्यामुळे यादवही पेट्रोलपंपाच्या केबिनमधून बाहेर आला. यावेळी जमावाने सुनिलला मारहाण केली. हा जमाव आपल्या अंगावर येण्याच्या भीतीने, संबंधित प्रवाशाला धमकवण्यासाठी यादवने स्वत:जवळील पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. यादवचा हा अवतार पाहून जमावाची पळापळ झाली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. हा प्रकार समजताच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी आला. पोलिस आल्याचं पाहताच जमाव पांगला. या प्रकरणी संशयित मुकुंद यादव याला शाहुपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांनी आणलं. त्याच्याकडे या प्रकरणाची कसून चौकशी सुरु होती. त्यासह संबंधित प्रवाशाकडून या घटनेची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम सुरु होते. घटनास्थळी पोलिसांना दोन पुंगळ्या सापडल्या. त्यांनी या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी यादव याच्यावर हत्येचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget