एक्स्प्लोर
कोल्हापूर महापौरपदासाठी भाजप दावा करणार

मुंबई/कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत भाजप आता सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोल्हापूरच्या महापौर आणि काँग्रेस नगरसेविका अश्विनी रामाणे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली. रामाणे यांच्यासह 7 जणांचे सदस्यत्व रद्द झालं आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि ताराराणी आघाडी दावा करणार आहे. "महापौर पदासाठी भाजपा दावा करणार असून ती जिंकण्याचा पुरेपर प्रयत्न आम्ही करु" असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. नियमानुसार विजयी उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होतं. मात्र महापौर अश्विनी रामाणे या आपलं जात वैधता प्रमाणापत्र सादर करु शकल्या नाहीत. अश्विनी रामाणे या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. रामाणे यांच्यासह काँग्रेसच्या दीपा मगदूम आणि राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांचंही सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. सदस्यत्व रद्द झालेले नगरसेवक
- अश्विनी रामाणे - काँग्रेस
- दीपा मगदूम - काँग्रेस
- वृषाली कदम - काँग्रेस
- डॉ. संदीप नेजदार - काँग्रेस
- सचिन पाटील - राष्ट्रावादी काँग्रेस
- संतोष गायकवाड - भाजप
- निलेश देसाई - ताराराणी आघाडी
संबंधित बातम्या
कोल्हापूर महापालिका प्रभागनिहाय निकाल
कोल्हापुरात काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























