एक्स्प्लोर
दादांच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, कोल्हापूरच्या महापौरांना धक्काबुक्की
ही धक्काबुक्की कोणी कार्यकर्त्यांनी नव्हे तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांकडून झाल्याचा आरोप महापौर शोभा बोंद्रे यांनी केला.

कोल्हापूर: गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की झाली. महत्त्वाचं म्हणजे ही धक्काबुक्की कोणी कार्यकर्त्यांनी नव्हे तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांकडून झाल्याचा आरोप महापौर शोभा बोंद्रे यांनी केला. कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचं पूजन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यादरम्यान महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की झाली. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेल्या घटनेचा निषेध करते. इथून पुढं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं की नाही ते ठरवावं लागेल, अशी प्रतिक्रिया महापौर बोंद्रे यांनी दिली. माध्यमांशी बाचाबाची तुकाराम माळी गणपतीच्या पूजनानंतर कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. ते कव्हर करण्यासाठी माध्यम प्रतिनिधी आले असता, पोलिसांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. चंद्रकांतदादांनी ढोल वाजवला दरम्यान, या मिरवणुकीच्या सुरुवातीला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ढोल वाजवला. दरवर्षी चंद्रकांत पाटील या मिरवणुकीत सहभागी होऊन, ढोल ताशे वाजवतात. राज्यभरात गणेश विसर्जनाचा जल्लोष लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज विसर्जन केलं जाणार आहे. मुंबईसह राज्यभरात आज गणेश विसर्जनाचा उत्साह आहे. डॉल्बीवर बंदी असल्यामुळे काही ठिकाणी नाराजी आहे, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लेझिम, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे.
आणखी वाचा























