एक्स्प्लोर
Advertisement
आनंद महिंद्रा ते अक्षय कुमार, दिग्गजांना आवडलेला 'हा' बाप्पा माढ्यातला
सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब येथील सन्मती कला क्रीडा मंडळाने दोन वर्षांपूर्वी बनवलेला झाडाचा बाप्पा आजही सोशल मीडियावर हिट ठरत आहे. एबीपी माझाने दोन वर्षांपूर्वीच याबाबत बातमी दाखवली होती.
पंढरपूर : “मी दगडात नाही, देवळात नाही, तर वृक्षात आहे”, असा अनोखा संदेश देत सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब येथील सन्मती कला क्रीडा मंडळाने दोन वर्षांपूर्वी बनवलेला झाडाचा बाप्पा आजही सोशल मीडियावर हिट ठरत आहे. एबीपी माझाने दोन वर्षांपूर्वीच याबाबत बातमी दाखवली होती.
उद्योगपती आनंद महिंद्रा, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत संकल्पनेचं कौतुक केलं आहे. माढा तालुक्यातील मोडलिंब येथील संमती कला क्रीडा मंडळाने पर्यावरणाचा विचार करत चक्क एका झाडालाच बाप्पाचं रूप देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता.
गणेशाची मूर्ती बसवण्याऐवजी अतिशय कल्पकतेने या मंडळातील कार्यकर्त्यांनी झाडालाच गणेशाचं रूप दिलं होतं. त्यावेळी गणेशाची प्रतिष्ठापना करताना इको फ्रेंडली बाप्पाचा विचार सुरु झाल्यावर मंडळाचे मार्गदर्शक आण्णाराव खंडागळे यांनी झाडालाच बाप्पाचे रूप देण्याची कल्पना मांडली आणि त्यांनीच लावलेल्या एका वृक्षाची निवड करून त्यावर काम सुरु करण्यात आलं.Such a lovely concept...I am not in stone, I am not in a temple.... but I am in trees ....so plant trees for a better future ????????????????????#GanpatiBappaMorya ???????? pic.twitter.com/MQMh3vowCu
— Akshay Kumar (@akshaykumar) September 14, 2018
झाडाला गणेशाचं रूप देताना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. यासाठी निवडलेल्या झाडाला बाप्पाच्या सोंडेचा फुगवटा, डोळ्यासाठीच्या खोबण्या या नैसर्गिक स्वरूपात असल्याने त्याला बाप्पाचं रूप देणं फारच सोपं गेलं. झाडाला एका वैशिट्यपूर्ण रितीने फेटा बांधत बाप्पाचं मस्तक साकारण्यात आलं. यानंतर डोळे, सोंड आणि शरीरावर नैसर्गिक रंगाने रंगवून चेहरा आणि शरीराचा आकार बनवण्यात आला. कानासाठी सुपाचा वापर केला, तर दोन हात छापडीपासून बनवून कागदाचे दात आणि सुळे बनवण्यात आले. कमरेला पितांबर नेसवून बाप्पा उभा असल्याचा देखावा अतिशय कल्पकतेने बनवण्यात आला होता. पर्यावरणाचा संदेश देणारा हा बाप्पा बनवण्यासाठी त्यावेळी अवघा 300 रुपये खर्च झाला होता. निसर्ग आणि वृक्ष म्हणजेच बाप्पा असून वृक्षाचं संवर्धन आणि जतन करा हा संदेश देणाऱ्या या तरुणाईने लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या हजारो मंडळांना दिलेला संदेश आजही मार्गदर्शक ठरत आहे.Yesterday I tweeted Hubert Reeves’ quote about how man is “...unaware that the nature he is destroying is this God he is worshipping.” Today I received this pic in my #whatsappwonderbox Brilliant way of aligning our environmental & spiritual goals. pic.twitter.com/Wri4PpqGHb
— anand mahindra (@anandmahindra) September 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement