Kishori Pednekar On Amruta Fadnavis : 'अशी नशिबानं थट्टा मांडली...'; ठाकरेंना टोला लगावणाऱ्या अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं गाण्यातून प्रत्युत्तर
आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) गाण्यातून उत्तर दिलंय.
Kishori Pednekar On Amruta Fadnavis : छोट्या पडद्यावरील बस बाई बस (Bus Bai Bus) या कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी यावेळी अमृता फडणवीस यांना 'कशी नशिबान थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केला. आता अमृता फडणवीस यांना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) गाण्यातून उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांना उद्देशून किशोरी पेडणेकरांनी कोणत्या गाण्याचा उल्लेख केलाय पाहुयात....
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
बस बाई बस कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांना नशिबान थट्टा मांडली हे गाणं ऐकवलं होतं. गाणं ऐकल्यानंतर कोणत्या व्यक्तीचं नाव समोर येतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते.
आता किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना गाण्यातून उत्तर दिलं आहे.
किशोरी पेडणेकरांनी गायलेले गाणे-
अशी कशी नशिबान थट्टा मांडली. एक होता निर्मळ माणूस,
देवेंद्र त्याचे नाव
मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केले हो,
एका 'अमृताची' दृष्ट त्यांना लागली
त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले
अशी कशी नशिबानं थट्टा मांडली...
अमृता फडणवीस या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अमृता यांनी बस बाई बसमध्ये अनेक गोष्टींची माहिती दिली. त्यांना काही प्रश्न देखील या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आले. 'तुम्ही प्लास्टिक सर्जरी केलीये?' असा प्रश्न प्रेक्षकांमधील एका महिलेनं विचारला. या प्रश्नाला उत्तर देत अमृता फडणवीस म्हणाल्या, 'बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण मला याबाबतीत अनेकांनी ट्रोल केलं. प्लास्टिक सर्जरी करायला खूप हिंमत लागते. यामध्ये एक रिस्क आहे की जर काही चुकलं तर तुमचा चेहरा बिघडू शकतो. लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरमध्ये पण गेले नाही. लग्नाच्या वेळेस फक्त मेक-अप केला. देवेंद्रजी हे स्त्रीचं मन पाहतात.'
पाहा व्हिडीओ:
वाचा इतर बातम्या:
Bus Bai Bus : 'प्लास्टिक सर्जरी केलीये?'; अमृता फडणवीसांना प्रश्न, उत्तर देत म्हणाल्या...