(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक, राज्यभर जोडे मार आंदोलन
Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून त्यांनी ठिकठिकाणी जोडे मार आंदोलन केलं.
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला आणि सर्वत्र खळबळ उडाली. या व्हिडीओमुळे किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आलेत. महत्त्वाचं म्हणजे, इतर नेत्यांवर वारंवार आरोप करण्याची ख्याती असलेल्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, तेही विरोधकांच्या रडारवर आलेत. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. आणि व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केलीय. त्याचवेळी कोणत्याही महिलेवर आपण अत्याचार केला नसल्याचं स्पष्टीकरणही किरीट सोमय्या यांनी दिलंय. त्यानंतर विरोधकांनी सोमय्यांच्या मुद्द्यावरून विधानपरिषद डोक्यावर घेतली आणि आरोपांची राळ उडवली.
ठाण्यात जोडेमार आंदोलन
ठाण्यातून ठाकरे गटाच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केलं. ठाण्यातील चिंतामणी चौक येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारो आंदोलन केलं.
अकलूजमध्ये युवासेनेचं आंदोलन
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे आणि शिवसेना तालुकाप्रमुख संतोष भैय्या राऊत यांच्या नेतृत्वात किरीट सोमय्या यांच्याविरोधात आंदोलन केलं. किरीट सोमय्या यांची भाजपने तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी करत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलं.
पाथर्डीमध्ये महिला आंदोलकांनी केलं जोडे मार आंदोलन
भाजपचे नेते किरीट सोमय्या याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी पाथर्डी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. पाथर्डी शहारातील नाईक चौकात शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी फोटो पायदळी तुडवला.. किरीट सोमय्यांच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पालघरमध्ये आंदोलन
किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओ विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आज पालघरमध्ये जोरदार निदर्शने केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत पालघर मधील हुतात्मा चौक येथे किरीट सोमय्या यांच्या फोटोला काळ फासत, जोडे मारो आंदोलन केलं. 'लोकांची काढतो ईडी आणि स्वतःची निघाली सीडी' अशी घोषणाबाजी यावेळी महिला कार्यकर्त्यांनी देत हे पोस्टर जाळण्यात आलं.
भिवंडीत आंदोलन
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी भिवंडीत आंदोलने केलं. भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात नाशिक मुंबई महामार्गावर शिवसैनिकांनी एकत्र येत सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले. मोठ्या संख्येने महिला सोमयांचे पोस्टर हाती घेऊन जोडे मारो आंदोलन केले आणि किरीट सोमय्या यांचा निषेध केला आहे.
ही बातमी वाचा: