एक्स्प्लोर

Nanded Case : हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार, म्होरक्या अद्याप फरार

Maharashtar Nanded Case : हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार असून म्होरक्या हरविंदर सिंह रिंदा अद्याप फरारच. पाकिस्तानात असल्याची सूत्रांची माहिती

Khalistani Terrorist Harvinder Singh Rinda : हरियाणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार आहे. खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाच्या 4 हस्तकांना करनालमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान, या दहशतवाद्यांचा म्होरक्या रिंदा सध्या पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. तसेच, तो पाकिस्तानातून भारताविरोधात दहशतवादी कट रचत असल्याचा धक्कादायक खुलासा तपासातून झाला होता. 

खलिस्तानी दहशतवादी रिंदानंच तेलंगणामध्ये RDX पाठवलं

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच (Harvinder Singh Rinda) तेलंगणामध्ये आरडीएक्स पाठवलं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला होता. स्लीपर सेलच्या मदतीनं हरविंदर सिंह रिंदा यानं आरडीएक्स पाठवलं असल्याची माहिती दिली आहे. हे आरडीएक्स नांदेडमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती सुरुवातीला होती, पण त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार, हे आरडीएक्स तेलंगणामध्ये पाठवण्यात आलं होतं. 

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कथित मानवी स्फोटामागे हरविंदर सिंह रिंदाचाच हात असल्याचं लुधियाना येथील न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे, त्यादरम्यान रिंदानं स्फोटापूर्वी संशयितांशी चार संभाषणं केली असल्याचंही समोर आलं आहे.  

दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंह रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार, संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जात आहे. काल हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक केली होती. यावेळी चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसेच, आता महाराष्ट्र एटीएस अटकेत असलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget