एक्स्प्लोर

मोदीजी,'एक दिवस सूट द्या, पाकिस्तानवर तिरंगा फडकवतो'

कोल्हापूर: पाकिस्तानला चिरडून टाकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण आम्हाला ऑर्डर मिळत नाही. एका दिवसाची सूट द्या, पाकिस्तान काबिज करुन तिरंगा फडकवतो, असं चंदगड तालुक्यातील कारवे गावच्या जवानाने ठणकावून सांगितलं. कारवे गावचा सुपुत्र राजेंद्र तुपारे हे जम्मू काश्मीरच्या पूँछमध्ये शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या गावकऱ्यांशी संवाद साधला असता, गावकऱ्यांनी पाकिस्तानबद्दल एकच चीड व्यक्त केली. यावेळी कारवे गावातीलच सुट्टीवर आलेल्या जवानाशी 'एबीपी माझा'ने संवाद साधला. "आम्ही सैन्यदलात आहोत, देशाला करुन दाखवायचं ही ताकद बाळगतो. आदेश देणं हे संरक्षणमंत्री, पंतप्रधान नेत्यांच्या हातात आहे. आम्ही बलिदान देण्यासाठी तयार असतो, आम्हाला आर्डर मिळत नाही, त्यामुळे हे नुकसान होतंय. मी स्वत: पूँछला राहून परिस्थिती बघितली, त्यावेळी आम्हाला जे अधिकार पाहिजे होते, ते मिळत नाहीत, ते सरकारचं दुर्दैव आहे.. आम्हाला सूट द्या, एका दिवसात पाकिस्तानवर तिरंगा फडकवतो. पाकिस्तानवर कब्जा करण्याची क्षमता भारतीय जवानांमध्ये आहे. मात्र आम्हाला ऑर्डर न मिळाल्याने भारतीय सैन्य कमजोर पडत आहे ", अशी प्रतिक्रिया कारवे गावच्या जवानाने व्यक्त केली. दुसरीकडे गावकरी म्हणाले, "मोदींना सांगू इच्छितो, ठिपक्यासारख्या पाकिस्तानला धडा शिकवा. एकदा आर या पार होऊन जाऊ दे. आम्ही कारवेवासिय देशसेवेसाठी तयार आहोत. चिमुरड्या पाकिस्तानला चिरडून टाका, लष्कराला आदेश द्या" राजेंद्र तुपारे शहीद सीमेवरील गोळीबारात महाराष्ट्रातील जवान राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले. 14 वर्षे त्यांनी भारतमातेची सेवा केली आणि आज शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांना आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आहेत. शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव आज कोल्हापुरातील मूळगावी आणणार कोण होते राजेंद्र तुपारे? शहीद राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कारवे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली बेळगाव इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. सध्या ते पुंछमध्ये सीमेवर तैनात होते. राजेंद्र तुपारे यांनी 14 वर्षे भारतमातेची सेवा केली, मात्र रविवारी शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, दोन आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आणि आई-वडील आहेत. पाकच्या गोळीबारात कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारेंना वीरमरण कारवे गावावर शोककळा शहीद राजेंद्र तुपारे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कारवे गावावर शोककळा पसरली आहे. तुपारे कुटुंबाला समाजकार्याची पार्श्वभूमी आहे. कुटुंबाच्या सांत्वनासाठी कालपासूनच कारवेमध्ये रांगा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget