(Source: ECI/ABP News/ABP Majha)
करुणा शर्मांची तिघांकडून मोठी फसवणूक; संगमनेरमध्ये तक्रार दाखल
Karuna sharma: करुणा शर्मा यांची (Karuna Sharma) 30 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Karuna sharma: करुणा शर्मा यांची (Karuna Munde) 30 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संगमनेरमधील तिघांनी त्यांना एका कन्स्ट्रक्शन कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल, असे सांगत त्यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले. याचा कुठलाही परतावा न दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर करुणा शर्मा यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील तिघांनी करुणा मुंडे यांच्या सोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेत करुणा शर्मा यांचा विश्वास संपादन केला. आमची लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. 30 लाख रुपये गुंतवल्यास कमीत कमी 45 हजार रुपये किंवा जास्तीत जास्त 70 हजार रुपये दर महिना या प्रमाणे नफा देऊ. तसेच यापेक्षा जास्त फायदा झाल्यास त्या प्रमाणात तुम्हाला नफा देण्यात येईल, असे करुणा शर्मा यांना सांगण्यात आले.
ठरल्याप्रमाणे त्यांनी जानेवारी 2022 मध्ये रोख रक्कम आणि धनादेश स्वरूपात असे एकूण 30 लाख रुपये दिले. फेब्रुवारीमध्ये एकदाच मुंडे यांना 45 हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी संबंधितांकडे पैसे मागितले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचे करुणा शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा
आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर करुणा शर्मा यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. करुणा शर्मा यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील भारत संभाजी भोसले, विद्या संतोष अभंग आणि प्रथमेश संतोष अभंग या तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या