एकाच घरात राहून दोन मुलांना जन्म दिला, करुणा शर्मा-धनंजय मुंडेंचे लग्नासारखेच संबंध; कोर्टाचे शिक्कामोर्तब
करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते असे निरीक्षण माझगाव कोर्टानं (Mazgaon court ) नोंदवलं आहे.
मुंबई : करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते असे निरीक्षण माझगाव कोर्टानं (Mazgaon court ) नोंदवलं आहे. त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण माझगांव सत्र न्यायालयानं दिलं आहे. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हानं शनिवारी फेटाळं आहे.
धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य
दरम्यान, कोर्टाच्या या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आपल्या याचिकेत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळं करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टानं केला आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटलेलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा ?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी न्यायालयाचे आभार मानत असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. लग्नाचे संबंध होते. आम्हाला दोन मुले झाली आहे. 27 वर्ष आम्ही संसार केला असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे. एवढे वर्ष एकत्र राहून तुम्ही दोन मुलांना बायकोला कसं सोडू शकता? असा सवाल देखील करुणा शर्मा यांनी केला आहे. हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण झाला आहे. तुम्ही मंत्री आहे म्हणून काहीही करु शकता का? तुम्ही आमदार आहेत म्हणून काहीही करु शकता का? असे सवाल यावेळी करुणा शर्मा यांनी उपस्थित केले. पण आता न्यायालय जागरुक असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या आहेत. याच्यापुढे खूप मोठी स्टोरी आहे. माझ्या आईचं निधन आहे, बहिणीसोबत झालेला बलात्कार आहे, मला जेलमध्ये टाकणे आहे. मला गुंड लोकांनी केलेली मारहाण, माझ्या मुला मुलींना उचलून नेण्यात आलेली गोष्टी असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:























