एक्स्प्लोर

Karuna Sharma : मला प्रेमात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप, सगळंच सांगितलं

 Karuna Munde on Dhananjay Munde: मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल त्याला धनंजय मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे.

मुंबईमहाराष्ट्रातला एका असा मंत्री आज आहे ज्याने 27 वर्ष सोबत असलेल्या महिलेला रस्त्यावर आणलं आहे. माझं जीवन केवळ देवा चरणी आहे. यामुळेच आज धनंजय मुंडे घरी बसले आहेत. दिल्या 27 वर्ष मी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे पाळलं. गाडीवरून तमाशा उभा केला. आज मला रस्त्यावर आणणारा, मीडियावर आणणारा हा व्यक्ती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आहे. नाही तर मला काहीही हौस नव्हती कोर्ट आणि मीडियासमोर उभे राहण्याची. असे म्हणत करुणा मुंडे  (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहे. 

मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल त्याला, 20 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. महाराष्ट्रात कुणी असेल जो मला फसवून माझ्याशी लग्न करेल त्यासाठी राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर आणि माझे पती धनंजय मुंडे या दलालांनी मिळून हा कट रचला होता. माझे पती वाईट नाहीत. मात्र जे दलाल त्यांनी पळून ठेवले आहेत त्यामुळे आज मला सर्वासमोर उभं राहून हे सांगावं लागतंय, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

1996 मध्ये मला हीरोइन होण्याची संधी होती, पण...  

1996 मध्ये मला हीरोइन होण्याची संधी होती. मोठमोठ्या दिग्दर्शकांनी मला अभिनेत्री होण्याची ऑफर दिली होती. मात्र मी ते सोडून आपल्या पतीसोबत चांगलं आयुष्य जगण्याचे स्वप्न बघितलं. मात्र त्यांनीच आज माझ्या बदनामीचा कट रचला. माझ्यामागे गुंड लावले, घराभोवती पोलिसांचा पहारा उभा केला, रस्तावर आणलं, असे अनेक कृत्य करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे आज जे हाल आहे, ज्यामुळे ते आज घरी बसले आहेत ते केवळ माझ्यामुळे नाही. तर त्यांनी जे लोक स्वत: जवळ पाळले आहेत, त्यात  राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि वाल्मिक कराड सारखे दलाल यांना पाळले आहे. जे त्यांना केवळ मुली आणि दारू पुरवतात. त्यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचे हे हाल आहे, ते घरी बसले आहे. असा गंभीर आरोप ही करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे.

मी कायद्याची लढाई लढेल, कारण...  

मला आणि माझ्या मुलीला आज धमकी येत आहे. व्हिडीओ वायरल केले जातील असं सांगण्यात येत आहे. त्यांना मी सांगते की त्यांना जे करायचं आहे ते करा. मला काहीही फरक पडत नाही. मी कायद्याची लढाई लढेल कारण माझ्याजवळ पुरावे आहेत. ज्यांच्याजवळ पुरावे नाहीत ते आपल्या खोलीत बसून हा सगळा तमाशा पाहत आहे असेही करुणा मुंडे म्हणाल्या.  

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक, अखेर आव्हाड यांच्याकडून सभागृहाची माफी
जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक,अखेर सभागृहाची माफी
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget