एक्स्प्लोर

काळा दिन LIVE UPDATE | महाराष्ट्रातील बसेसवर बेळगावमध्ये हल्ल्या करण्याचा प्रयत्न

Karnataka day :1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे.

LIVE

काळा दिन LIVE UPDATE | महाराष्ट्रातील बसेसवर बेळगावमध्ये हल्ल्या करण्याचा प्रयत्न

Background

बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकारची मराठी भाषिक बांधवांवर दमदाटी सुरुच आहे. मराठी भाषिकांनी उद्या अंगावर एकही काळा कपडा घालू नये, असं फर्मान कर्नाटक सरकारनं काढलं आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची दमदाटी
काळा दिन धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दमदाटी करून आंदोलन स्थळी जावा.येथे थांबू नका असे कार्यालयाकडे जमलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी सांगितले.सायकल फेरी रद्द झाल्यामुळे मराठा मंदिर येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसैनिक जमले होते.त्यावेळी पोलिसांनी तेथे दाखल होऊन आक्षेप घेतला.तुम्ही आंदोलनस्थळी जा, येथे कशाला जमला आहात असे विचारून दमदाटी केली.

सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच - लक्ष्मण सवदी
बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे केलं आहे.महाराष्ट्रात कोण काही म्हणतंय म्हणून काय होत नाही. मुंबईत बसून बोलू नये त्यांनी बेळगावात आमच्या भूमीत येऊन बोलावं. त्याला आम्ही चोख उत्तर देऊ असं आव्हानही सवदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

सवदी यांच्या वक्तव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख उत्तर दिलं आहे. चंद्र-सूर्य नाही तर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावरून खाली होण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात घेऊ असं प्रति आव्हान हसन मुश्रीफ यांनी सवदी यांना दिलं.

कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने सायकल फेरी होणार नाही. केवळ निवडक कार्यकर्ते मराठा मंदिराच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत. कोणतीही फेरी, मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. 1956 साली राज्य पुनर्रचना झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत असून त्या दिवशी मराठी भाषिक फेरी काढतात. यावर्षी देखील फेरीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी फेरीसाठी परवानगी देण्याची मागणी करून निवेदन दिले होते.

14:20 PM (IST)  •  01 Nov 2020

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य बालिश, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, केवळ आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांनी ते वक्तव्य केले , आपल्या देशात घुसखोरी सुरू आहे, त्या सीमा बंद करता आल्या नाहीत, मात्र महाराष्ट्रातला माणूस 1 नोव्हेंबरला कर्नाटकात जाऊ दिला जात नाही याचा सुद्धा निषेध, कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये, सामंतांची प्रतिक्रिया
14:40 PM (IST)  •  01 Nov 2020

बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांना हक्काच्या महाराष्ट्रात विलीन करावे यासाठी गुन्हा दाखल झाला तरी सीमा ओलांडून मी बेळगावात आंदोलन केले होते. होय! हा लढा आम्ही जिंकणारच! संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारच! - मंत्री धनंजय मुंडे
13:31 PM (IST)  •  01 Nov 2020

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पाठिंबा, बेळगाव, कारवार, निपाणीसह 'संयुक्त महाराष्ट्र' हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठाभाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास देतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे
12:28 PM (IST)  •  01 Nov 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर गनिमी काव्याने उपस्थित, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी एक प्रतिनिधी या सभेला येत असतात, एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे देखील उपस्थित
11:57 AM (IST)  •  01 Nov 2020

अमरावती : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे.त्यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरवात केली.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget