एक्स्प्लोर

करमाळ्यात बिबट्याचा थरार सुरूच, तीन फायर चुकवून, ट्रॅप भेदून पुन्हा वन विभागाला चकवा

नरभक्षक बिबट्याचा थरार करमाळा तालुक्यातील बिटरगाव भागात पाहायला मिळाला. एका शेतात मका टोचायचे काम सुरू असताना महिलेला दबा धरून बसलेला बिबट्या दिसला.वन विभागही तातडीने तयारीसह आला. ट्रॅप लावत बिबट्या नजरेस पडताच तीन फायर केले. मात्र यावेळीही दुर्दैवाने बिबट्या निसटला.

करमाळा : नरभक्षक बिबट्याचा थरार करमाळा तालुक्यातील बिटरगाव भागात पाहायला मिळाला. येथील एका शेतात मका टोचायचे काम सुरू असताना एक महिलेला दबा धरून बसलेला हा बिबट्या दिसला लगेच तिने जोरात ओरडत त्याच्या दिशेला दगड भिरकावत असताना त्याने अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सोबतचे लोकांनीही गोंधळ घालत दगडांचा भडीमार सुरू केल्यावर बिबट्याने माघार घेतली. वन विभागही तातडीने तयारीसह येथे आला व ट्रॅप लावत बिबट्या नजरेस पडताच तीन फायर केले. मात्र यावेळीही दुर्दैवाने बिबट्या निसटला. मग बिबट्या लपलेल्या केळीच्या शेताला चारही बाजूने घेरण्यात आले.

राज्यात या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांनी गमावला आपला जीव, 10 वर्षातील सर्वोच्च संख्या

दरम्यान बिबट्याच्या शोधासाठी वैदू जातीच्या लोकांनी एक गाडीतून त्यांची कुत्रीही आणली. शेजारी असलेल्या उसातून पळून जाऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने ऊस पडला. अंधार पडू लागल्याने भोवती ट्रॅक्टर आणून दिवे लावण्यात आले. परिसरातील शेकडो ग्रामस्थ हातात काठ्या कुऱ्हाडी व मशाली घेऊन सज्ज होते. मात्र तीन तासाच्या प्रयत्नानंतरही बिबट्या निसटल्याने दहशत अजून वाढली आहे. ढोकरी - बीटरगाव येथील ट्रॅप मधून बिबट्याने पळ काढल्याने आता जवळपासच्या सर्व वस्तीवरील आणि ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी, वांगी 1 , वांगी 4 परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या 8 वर्षीय मुलीचा मृत्यू; सोलापुरातील करमाळ्यात तिसरा मृत्यू

एक डिसेंबरपासून हा बिबट्या करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह आणि शेटफळ चिखलठाण परिसरात आपली दहशत ठेऊन आहे. आजपर्यंत करमाळा परिसरात  तीन जणांचा बळी ह्या बिबट्याने घेतला आहे. शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह पाच गनमॅन ट्रॅप लावून बिबट्याच्या मागावर आहेत.  साडे चार वर्षे त्याचे वय असावे असा अंदाज डॉ. मंडलिक यांनी व्यक्त केलं आहे. परिसरातील लोकांनी सायंकाळी पाच ते सात आणि सकाळी दहा ते बारापर्यंत काळजी घ्यावी, कारण हा त्याचा हल्ला करण्याची वेळ आहे. हा बिबट्या जनावरांवर हल्ला करत नाही. तो फक्त माणसांवर हल्ला करतो. कदाचित माणसामुळे तो डिस्टर्ब झाला असावा, असा अंदाज मंडलिक यांनी व्यक्त केला. पण आज रात्री पेट्रोलिंग करून बिबट्याला मारू असा विश्वास त्यांना आहे. संबंधित बातम्या नरभक्षक बिबट्याने करमाळ्याच्या सांगवी भागात केला हल्ल्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांनी दिली भेट

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget