ग्रामपंचायतीकडून मोफत सॅनिटरी पॅड मिळणार! सातारा जिल्ह्यातील गावात ग्रामसभा घेऊन निर्णय
सातरा जिल्ह्यातील एका गावात ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीतर्फे मोफत सॅनिटरी पॅडचे (Free Sanitary Pads) वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा : शहरी भाग असो वा ग्रामीण भाग मासिक पाळी या विषयावर सहसा कोणच कोणाशी बोलताना दिसत नाही. एवढच नाही तर मासिक पाळीवर महिलाही दुसऱ्या महिलांसोबत बोलताना कुचंबतात. मात्र, सातारा जिल्ह्यातील एक अस गाव आहे की त्या गावात आता या विषयावर महिला ग्रामसभा झाली आणि गावात कायमचे मोफत सॅनिटरी पॅडचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील करंजे या गावात सॅनिटरी पॅडच्या वाटपासाठी रांग लागत आहे. हो तुम्ही बरोबर वाचलत, आश्चर्य वाटल ना? करंजे हे राज्यातील असे पहिले गाव की या गावातील सर्व महिलांना आता ग्रामपंचायतीकडून मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले जाणार आहे. गाव पातळीवर महिला सॅनिटरी पॅड वापराकडे फारसे लक्ष देत नाहीत. आणि ग्रामीण भागात यावर फारसे बोलतही नाहीत. मात्र, आता या मोहिमेमुळे सातारा जिल्ह्यातील करंजे या गावातील शंभर टक्के महिला ह्या सॅनिटरी पॅडचा वापर करणार आहेत.
ग्रामीण भाग असो वा शहरी भाग मासिक पाळीवर महिला एकमेकांशी बोलत नाही. त्यामुळे महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यात वयात आलेल्या मुलींची तर मोठी अडचण होते. त्यात ग्रामीण भागात या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. विशेष म्हणजे या विषयावर मुली स्वत:च्या आईसोबतही या विषयावर बोलत नाहीत. परंतु, या गावात महिलासभा घेऊन गावातील शंभरट्क्के महिलांनी एकमेकांशी बोलनेच सोडा तर गावात चार ठिकाणी सॅनिटरी पॅडचे मोफत वाटपच करण्याचे केंद्र बनवले.
महिलांवरच्या हिंसाचार या विषयावर काम करणाऱ्या छत्रपती शासन महिला सुरक्षा या संस्थेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्याच गावापासून मासिक पाळी या विषयावर काम करण्याचे ठरवले. वेदांतीकाराजे भोसले यांच्या हस्ते या मोहिमेची सुरवात झाली. झालेल्या कार्यक्रमानंतर या मोहिमेवर बोलताना आजही गावात सॅनिटरी पॅड वापरले जात नाही. यावर खंत व्यक्त करताना सॅनिटरी पॅडबाबत मोदींनी केलेल्या घोषणेची अमंलबजावणी सरकार का करत नाही असा सवाल विचारला.