एक्स्प्लोर
हुंड्यासाठी पत्नीचा छळ, न्यायाधीश पतीसह सात जणांवर गुन्हा
हुंड्यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात होता. अखेर विवाहितेच्या तक्रारीनंतर न्यायाधीश पतीसह कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![हुंड्यासाठी पत्नीचा छळ, न्यायाधीश पतीसह सात जणांवर गुन्हा Judge Tortured his wife for dowry case registered against seven हुंड्यासाठी पत्नीचा छळ, न्यायाधीश पतीसह सात जणांवर गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/22224850/shaikh-akram.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : हुंड्यासाठी विवाहितेचा छ्ळ केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीशांसह सात जणांविरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड येथील रहिवासी शेख वसिम अक्रम या 28 वर्षीय तरुण न्यायाधीशाचा मुंबई येथील तरुणीशी डिसेंबर 2016 मध्ये विवाह झाला. सासरच्यांनी 15 लाख रुपये हुंडा मागितला.
लग्नापूर्वी आणि नंतरही न्यायाधीश पती शेख वसिम अक्रम, न्यायाधीश दीर शेख अमीर, न्यायाधीश नंदवई शेख जावेद सिद्दिकीसह सासू, सासऱ्यांनी हुंड्यासाठी विवाहितेचा छ्ळ सुरु केला. सासरच्यांनी पंधरा लाख रुपये हुंडा मागितला.
लग्नापूर्वी मुलाने कार घेण्यासाठी साडेतीन लाख रुपये घेतले. त्यानंतर हुंड्याच्या साडे अकरा लाख रुपयांसाठी अनेक वेळा मारहाण करण्यात आल्याचा आरोप विवाहितेने केला. पैसे न दिल्याने मारहाण करुन घरात कोंबून ठेवण्यात आल्याचाही आरोप आहे.
अंगावरचे आठ लाख रुपयांचे दागिने काढून घेण्यात आले. शिवाय दोन दिरांनी विनयभंग केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन इतवारा पोलिसांनी हुंड्यासाठी छळ करणे, मारहाण करणे, बळजबरी दागिने हिसकावणे, आणि विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच सर्व सात जणही फरार झाले आहेत. पीडितेचा सासरा वकील असून अन्य एका दिराने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)