Job Majha : भारतीय नौदल, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी भारतीय नौदल, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
भारतीय नौदलामध्ये विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट - सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)
- जागा - 10
- शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना
- 01 वर्षे अनुभव
दुसरी पोस्ट- पेस्ट कंट्रोल वर्कर
- जागा - 12
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
- वयाची मर्यादा : 28 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- अर्ज पद्धती : ऑफलाईन
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2021
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004.
- अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांच्या 14 जागांसाठी भरती निघाली आहे
पहिली पोस्ट- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Fulltime Medical Officer
- एकूण जागा - 02
- शैक्षणिक पात्रता : MBBS, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
दुसरी पोस्ट- परिचारिका/ Staff Nurse
- एकूण जागा - 03
- शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग व मिडवायफरी डिप्लोमा, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
तिसरी पोस्ट- परिचारिका/ Auxillary Nurse Midwife
- एकूण जागा -04
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण,मान्यात प्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
अनुभव असल्यास प्राधान्य
चौथी पोस्ट - प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician
- एकूण जागा - ०4
- शैक्षणिक पात्रता : बी. एस. सी. तथा डि. एम. एल. टी., अनुभव असल्यास प्राधान्य
- निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
- मुलाखत दिनांक : 12 व 13 ऑगस्ट 2021 रोजी
- मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , तिसरा मजला मिरा भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ , भाईंदर (प) ठाणे – 401101
- अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in