जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द, कोरोनामुळे ग्रामस्थांचा निर्णय
सोमवारी 12 एप्रिलला होणारी जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची 12 एप्रिलला होणारी सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. राज्यामध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार 12 एप्रिल रोजी जेजुरीच्या खंडोबाची सोमवती आमावस्या आली आहे. मात्र सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात अमावास्येला प्रारंभ आहोत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही.. शिवाय खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने ही कोरोना मुळे यात्रा रद्द करावी अशी सूचना केली होती.. यामुळे सोमवती यात्रा व पालखी रद्द करण्यात आली आहे.. सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत परंतु भाविकांना दर्शन दिला जाणार नाही त्यामुळे भाविकांनी या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या अशा प्रकारच्या यात्रा वा उत्सव साजरे करण्यावर बंधने आली आहेत. तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करू नये असं आवाहनही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक मंदिरांनी आपले उत्सव साजरे न करण्याचा निर्णय घेतला असून जेजुरीच्या ग्रामस्थांनीही सोमवती अमावस्या साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- TRP Scam : टीआरपी घोटाळ्यातही सचिन वाझे यांचं नाव, 30 लाखांची लाच घेतल्याचा आरोप; ईडीकडून व्यवहारांची चौकशी
- Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचं समन्स; देशमुखांच्याही चौकशीची शक्यता
- Gudi Padwa 2021: केव्हा आहे गुढीपाडवा, जाणून घ्या या दिवसाचा मुहूर्त, तिथी आणि पूजा विधी