Jayant Patil : वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, तेच पुढील पीढीला योग्यरित्या पुढे नेतील असा विश्वास होता; जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा
Jayant Patil : जयंत पाटील यांनी शरद पवारांबाबत वसंतदादांचा किस्सा सांगितला. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये बोलताना जयंत पाटील यांनी राज्यात 200 टक्के राष्ट्रवादी वाढवणे हेच डोक्यात असल्याचे ते म्हणाले.
Jayant Patil on Sharad Pawar : वसंतदादा पाटील यांनीच त्याकाळी शरद पवाराना प्रमोट केले, महाराष्ट्राचे पुढील राजकारण करण्यासाठी शरद पवारच माणूस सक्षम आहे, राज्यातील बहुजन समाजाची, ग्रामीण भागाची सर्व बाजूने काळजी घेणारा शरद पवारच असू शकतो आणि शरद पवारच भविष्यात पुढच्या पिढीला योग्यरित्या पुढे नेतील असा वसंतदादाना विश्वास होता, असा किस्सा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आटपाडीत सांगितला.
आटपाडीमध्ये शेतकरी अभ्यास मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी शरद पवारांबाबत वसंतदादांचा किस्सा सांगितला. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये बोलताना जयंत पाटील यांनी राज्यात 200 टक्के राष्ट्रवादी वाढवणे हेच डोक्यात असल्याचे ते म्हणाले.
आटपाडीत पाण्याचा समान वाटा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची कार्यशाळा
आटपाडी, सांगोला आणि तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा आटपाडीमधील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. प्रत्येकाच्या शेताशेतापर्यंत मोजुन पाणी देणारी यंत्रणा येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी, हक्काचे पाणी, दोन पाळ्यांमधील काळात, आपल्या ताब्यात मोजून घेऊन, पाहिजे ती पिके घेण्याची यंत्रणा उभी करण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर यांची उपस्थिती होती.
काय आहे ही योजना?
सर्व प्रकारच्या कुटुंबाना शेती उपयोगी पाण्याचा समान वाटा मिळवण्यात आणि हे पाणी बंद पाईपच्या माध्यमातून सर्वांच्या शेतीपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा अंमलात आणायला सुरुवात करण्यात या भागात यश मिळाले आहे. हा जगातील पहिला उपक्रम आहे. पण याची अंमलबजावणी करण्यासाठी गावागावातील लाभधारक सहभागी झाले नाहीत, तर संपूर्ण यंत्रणा लवकर सुरू होणार नाही. दोष राहू नयेत यासाठी अधिकाऱ्यांबरोबरच तज्ज्ञांचा सहभाग घेतला आहे. कृषी संशोधन केंद्र, बारामती ही संस्थासुद्धा या प्रयोगात मदत करणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पाणी देण्याची यंत्रणा उभी करुन शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेणे, पाणी मोजून ताब्यात घेणे आणि उत्पन्न वाढविणे याचे मार्गदर्शन या अभ्यास मेळाव्यामध्ये करण्यात आले.
जयंत पाटलांचा केजरीवालांना टोला
दरम्यान, केजरीवालांचा पक्ष आता गुजरात निवडणूक लढवणार आहे, आपण हिंदू देवतांना मानतो हे दाखवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत असावेत. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे, कारण गांधींना जगमान्यता आहे. आता नोटेवर देव देवता आणि महापुरुषांचे फोटो लावणे अशा मागण्या पुढे येत असून त्यामुळे वाद निर्माण होतील. आता जी पद्धत आहे तीच चालू ठेवणे योग्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या