एक्स्प्लोर
अतिप्रसंगाला विरोध केल्याने चुलतदीराकडून महिलेची हत्या
जालना : जालना जिल्ह्यातील अंबडमधील सुमित्रा होंडे हत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतिश होंडे यांचा चुलतभाऊ विलास होंडेला सुमित्रा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अतिप्रसंगाला विरोध केल्याने आपण गोळी झाडल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.
अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतिश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा यांचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला होता. अंबड शहरातील इंद्राणी कॉलनीत सतीश होंडे राहतात. दुपारी होंडे यांचा पुतण्या घरी आला त्यावेळी त्याला सुमित्रा जखमी अवस्थेत दिसल्या. त्यानंतर त्याने कॉलनीतील नागरिकांना घटनेची माहिती दिली.
शेजाऱ्यांनी सुमित्रा यांना तातडीने अंबड मधील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं. मात्र सुमित्रा यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यानं त्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement