एक्स्प्लोर
'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेतील पैलवान बनला चोर!

जळगाव: एकेकाळी महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या शर्यतीत असणाऱ्या जळगावच्या सुनील पाटीलला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 2006 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुनीलनं चांगली कामगिरी केली होती. पण याच कालावधीत कैलास नवघरे या अट्टल चोराशी त्याची मैत्री झाली. त्याला चोरी करण्यात सुनील मदत करू लागला. सुनील पाटील याच्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर सुरतमध्ये खुनाच्या आरोपातही तो तुरुंगात होता. तिथून पॅरोलवर सुटून आल्यावर जळगाव जिल्ह्यात झालेल्या काही घरफोड्यामध्ये त्याचा हात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सात लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं असून सुनील पाटीलला अटक करण्यात आली आहे. सुनील पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सधन आणि सुशिक्षित परिवारातील युवक आहे. सुरुवातीपासून त्याला कुस्तीचे वेड होते. आपण महाराष्ट्र केसरी व्हावे अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी तो दिवस रात्र मेहनत घेत होता. सुनीलची मेहनत पाहून गुप्तचर विभागात काम करणाऱ्या त्याच्या मोठ्या भावाने त्याला कोल्हापूरच्या तालमीत प्रशिक्षणासाठी पाठविले होते. 2006 साली महाराष्ट्र केसरीच्या चौथ्या क्रमांकापर्यंत त्याने कुस्त्या जिंकल्या. ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेल्या विजय चौधरीलादेखील सराव सामन्यात आपण पराभूत केल्याचे तो सांगतो. एकीकडे कुस्तीचा हा प्रवास सुरु असताना, त्याची मैत्री कैलास नवघरेशी झाली. कैलास हा अट्टल चोर होता. कैलाससोबत राहून सुनीलही चोऱ्या करु लागला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























