एक्स्प्लोर

जळगावात दूध संघाच्या निवडणुकीवरुन रणकंदन; भाजप आमदाराने थेट एकनाथ खडसेंचा बापच काढला!

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळाले आहे.

Jalgaon News:  जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळाले आहे. माझा बाप काढता, तुमचा बाप काय धीरूभाई अंबानी होता काय? असा सवाल करत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना भाजपचे आमदार चव्हाण यांनी थेट एकनाथ खडसे यांचा बापच काढला आहे. खडसे साहेब, तुम्ही माझ्या बापावर गेले म्हणून मला तुमच्या बापावर जायचं नाहीये आणि ही माझी पद्धती नाहीये असे स्पष्टीकरण देखील नंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलं आहे.
 
मुक्ताईनगरमधील 19 पैकी 11 उमेदवार हे जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र एकनाथ खडसे असा आखाडा रंगवतात की माझ्यासमोर कुस्ती खेळायला कोणी तयारच नाही. त्या ठिकाणी कुणीही पात्र संस्था तुम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर टीका केली आहे.

जर एकनाथ खडसे हे स्वतःला एवढे मोठे नेते समजत असतील तर त्यांना माझी भीती बाळगण्याचं कारण नाही. माझ्यासारख्या एवढ्या छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी बोलण्याचं कारण नाही मात्र वयोमानाने त्यांचा तोल जात असेल असा टोलाही आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.

खडसे यांनी स्वतःसाठी, कुटुंबाच्या फायद्यासाठीच पक्षाला वापरलं

एकनाथ खडसे यांनी स्वतःसाठीच आणि कुटुंबाच्या फायद्यासाठीच पक्षाला वापरलं. स्वतःकडेच त्यांनी पक्षाला गहाण ठेवलं. एकनाथ खडसे सांगतात की माझा बाप असा होता, माझा बाप तसा होता, मात्र एकनाथ खडसे यांचा बाप काय धीरूभाई अंबानी नव्हता, असे म्हणत खडसे हे वयाने मोठे असल्याने आम्ही काही ठिकाणी त्यांचा आदर करतो, मात्र त्याचा ते गैरफायदा घेतात, असा जोरदार घणाघात आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे. 

खडसेंनी कुणाकुणाकडून कसे आणि कधी पैसे घेतले याचे सर्व पुरावे...

एकनाथ खडसे यांना माझं आव्हान असून त्यांनी सिद्ध करावं की मी कुणाकडून एक रुपया खाल्ला. नाही तर माझ्याकडे त्यांनी कुणा  कुणाकडून कसे आणि कधी पैसे घेतले याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे मला आव्हान द्यायला लावू नका, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंना दिला आहे. ठराविक पातळीपर्यंत एकनाथ खडसेंचा आम्ही आदर करू. मात्र ते खालच्या पातळीवर जातील तर आम्हालाही खालच्या पातळीवर जावे लागेल, आमचा नाईलाज आहे. मंगेश चव्हाण कुणाच्या दबावाखाली काम करणारा कार्यकर्ता नाही. हा ताट मानेने जगणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही जर माझ्या कुटुंबावर जाल तर तुमच्या कुटुंबाची तीन पिढ्यांची जंत्री माझ्याकडे आहे. मला तोंड उघडायला लावू नका एवढीच आपल्याला विनंती आहे, असे म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget