एक्स्प्लोर

Jalgaon on Coronavirus | जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! कोरोना बाधित रुग्णांमध्ये निम्याने घट, सोबतचं बरे होणांऱ्यामध्येही वाढ

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत होण्याच्या प्रमाणात निम्याने घट झाल्याचे समोर आले आहे. सोबतचं बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर जळगावकरांना दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने लाखांचा आकडा पार केला आहे तर सतराशेच्या पुढे रुग्ण हे कोरोनाने मृत्यू पावले आहे. असे असताना कोरोनाच्या वेगाने आलेल्या दुसऱ्या साथीने प्रशासनाच्या आणि जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण केल्याचं पाहायला मिळत होते. मात्र, मागील आठवडाभराचा विचार करता बाधीत होणाऱ्या रुग्ण संख्येत दिवसागणिक घट होत असल्याने आणि बाधित होणाऱ्या एवढेच रुग्ण बरे होऊन परत जात असल्याने प्रशासन आणि जनतेच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
     
जळगाव जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत सुरुवातीपासून हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर कोरोनाचा मृत्यूदर हा तेरा टक्क्यापर्यंत इतका जाऊन पोहोचला असल्याने  केवळ देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगाव चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न करून मृत्यूदर कमी करण्यात यश मिळविल्याने प्रशासन आणि जनतेत काहीशी बेफिकिरी दिसून आल्याचं दिसून आल्याच समोर आले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या लाटेचे रूपांतर केव्हा समूह संसर्गात झाले हे कोणालाही कळले नव्हते.

सध्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनाची दुसरी लाट ही उच्च पातळीवर असल्याचं पाहायला मिळत असल्याने आणि रोज साधारणपण बाराशे नवे रुग्ण आणि पंधरा बधितांचा मृत्यू असं समीकरण बनल्याने संपूर्ण जिल्हाभरात भीतीचं वातावरण पसरले असल्याचं दिसून येत होते. मात्र, गेल्या आठवड्याचा जर विचार केला तर दिवसागणिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असल्याचं समोर आल्याने जळगावकरांच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी आहे.

गेल्या आठवडाभरापासून अकराशे ते बाराशे नवीन बाधित रुग्ण समोर येत असले तरी त्यात बाधित होण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. मागच्या महिन्यात बाराशे बाधित रुग्ण हे पाच ते सहा हजार चाचण्यांमध्ये येत होते. तेवढेच नवीन बाधित रुग्ण आता आठ ते दहा हजार चाचण्यांत येत असल्याने बाधित होण्याचा दर हा वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणपण जवळपास तेवढेच असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी ठरली आहे. अजूनही पुढील काही काळात दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला जाईल, अशी शक्यताही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget