एक्स्प्लोर
डी वाय पाटील संस्थेवरील आयकर विभागाची कारवाई 24 तासानंतरही सुरुच
पिंपरी-चिंचवड : डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर छापा टाकल्यानंतर आयकर विभागाची कारवाई 24 तास उलटल्यानंतरही सुरुच आहे. डी वाय पाटील संस्थेच्या कॉलेजमधील कगदपत्रांची तपासणी अद्यापही सुरु आहे.
पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील शिक्षणसंस्थांवर आयकर विभागाने बुधवारी सकाळी धाड टाकली. पिंपरीत 22 अधिकाऱ्यांनी डी वाय पाटील संस्थेच्या मेडिकल, डेन्टिस्ट, फार्मसी तसंच इंजिनीअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी त्यांच्यासोबत 20 पोलिसही उपस्थित होते.
तर दुसरीकडे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेजवर आयकर विभागाने सकाळी साडेआठच्या सुमारास छापा टाकला होता. मात्र छाप्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संबंधित बातमी
डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement