एक्स्प्लोर
राष्ट्रीय आपत्ती कधी जाहीर करता येते?
महाराष्ट्रातले 6 जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. महापुरामुळे कोल्हापूरमध्ये दोन लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातच आज सकाळी सांगलीमध्ये बोट उलटून डझनभर माणसांनी जीव गमावला. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ओला दुष्काळ आहे. कोकणातल्या नद्यांनी विक्राळ रुप धारण केलं आहे. इतकी भीषण परिस्थिती असूनही केंद्र सरकारने अद्याप राष्ट्रीय आपत्ती घोषित केलेली नाही.
मुंबई : महाराष्ट्रातले 6 जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. महापुरामुळे कोल्हापूरमध्ये दोन लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातच आज सकाळी सांगलीमध्ये बोट उलटून डझनभर माणसांनी जीव गमावला. कराडमध्ये कृष्णेच्या पाण्याने शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. सिंधुदुर्गात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे आणि रत्नागिरी, रायगडमध्ये नद्यांनी विक्राळ रुप धारण केलं आहे. इतकी भीषण परिस्थिती असूनही केंद्र सरकारने अद्याप राष्ट्रीय आपत्ती घोषित केलेली नाही. त्यामुळे आज एबीपी माझाने सरकारला आवाहन केले की, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात निर्माण झालेल्या या अभूतपूर्व संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा.
एबीपी माझासह सामान्यांनीदेखील या भीषण संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. परंतु राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यासाठी सरकारचे काही धोरण आहे का? त्यासाठी काही निकष आहेत का? असे सवाल उपस्थित होतात.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 प्रमाणे आणि 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारसींप्रमाणे कोणतीही सुचित करण्यात आलेली नैसर्गिक आपत्ती तिच्या तीव्रतेवरुन 'राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून' मदत मिळण्यास प्रात्र ठरते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेची पातळी घोषित करण्यासाठी, राज्य आपत्ती मदत निधी (SDRF) किंवा राष्ट्रीय आपत्ती मदत निधी (NDRF)च्या नियमावली मध्ये कोणतेही नेमके निकष नाहीत.
एखाद्या आपत्तीची तीव्रता, गंभीरता किंवा व्याप्तीची पातळी ठरविण्यासाठी केंद्र सरकार त्या आपत्तीमुळे गेलेले जीव, मालमत्तेचे किंवा वास्तुचे झालेले नुकसान या बाबी विचारात घेते. त्याचबरोबर आजवरच्या इतिहासात आपत्तीमुळे अशी परिस्थिती कधी ओढवली आहे का? आपत्तीग्रस्तांना मदतकार्य पुरवण्याची स्थिती राज्यशासनाच्या हाताबाहेर गेली आहे का? याचासुद्धा केंद्र सरकारकडून विचार केला जातो.
प्रामुख्याने हे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या टीमच्या (IMCT – Inter Ministerial Central Team) शिफारसींवर अवलंबून असतं. ही टीम सुरुवातीला नैसर्गिक आपत्तीच्या घटनास्थळी जाऊन पाहणी करते. त्याचा एक अहवाल तयार केला जातो. त्या अहवालानुसार राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात येते.
कोल्हापुरातल्या महापुराचे ड्रोनद्वारे केलेले चित्रण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement