एक्स्प्लोर
झेडपीचा रणसंग्राम : सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरेंची मुलाखत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आता निवडणुकीच्या आखाड्य़ात उतरणार आहे. आदिती तटकरे रायगड जिल्ह्यातल्या रोह्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने आदित्य तटकरेंशी साधलेला संवाद...
प्रश्न : राजकारणात येण्यास उशीर झाला आहे का?
उत्तर : उशीर झाला नाही. कारण 2009 पासूनच मी राजकारणात आली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोबत वडिलांच्या प्रचाराची धुरा संभाळली. त्याआधी मी शिक्षण घेत होती. त्यानंतर मला तालुका पातळीवर जबाबदारी मिळाली. ग्राऊंड पातळीवर सुरुवात करावी म्हणून मी तालुकास्तरावर काम केलं.
प्रश्न : तटकरे आडनावाचा किती फायदा होतो आहे?
उत्तर : फायदा आणि नुकसान सुद्धा आहे. कारण तुम्हाला थेट तुमच्या वडिलांशी जोडलं जातं. माझे आजोबा पण राजकारणात होते. वडिलांसारखं होऊ शकते की नाही, काम करु शकते की नाही? अशी चर्चा स्थानिक पातळीवर होते. पहिल्या निवडणुकीला फायदा होईल. पण पुढे राजकीय कारकीर्द घडवायची असेल तर तुमचं काम बोलेल, आडनाव नाही.
प्रश्न : निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा झाला?
उत्तर : निवडणूक लढायचंच, असं काही ठरवलं नव्हतं. राजकारणात असल्याचा फायदा झाला. पण जिल्हा परिषदेपासून सुरुवात होतेय, याचा मला आनंद होतो आहे. कारण माझ्या वडिलांची सुरुवातसुद्धा अशीच झाली होती.
प्रश्न : घरातल्या वादाचा फटका बसेल का?
उत्तर : वाद आता मिटला आहे आणि शेवटी काम पक्षासाठी करायचं आहे. त्यामुळे वाद-विवाद आड येणार नाही.
प्रश्न : काकांच्या कुटुंबियांना भरभरुन दिलं. मग आदिती-अनिकेतला मागे का ठेवले?
उत्तर : असं काही नाही. आता माझ्या गाठीशी अनुभव आहे. वडिलांच्या प्रचाराचा अनुभव सोबत आहे. काय अडचणी येऊ शकतात याची जाणीव आहे.
प्रश्न : आदितीच निवडणुकीत का? अनिकेत का नाही?
उत्तर : आरक्षण. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा नाही. मी गेल्या 2 वर्षात राजकारणात सक्रीय आहे. राजकारणात संधी मिळेलचं असं नाही, नशीबाचीही साथ महत्त्वाची असते.
प्रश्न : वडिलांवर आरोप झाले. चौकशी सुरु आहे, याचा किती परिणाम होईल?
उत्तर : तो काळ खूपच वाईट होता. जेव्हा आरोप व्हायचे भावनिक रित्या आम्ही खचलो होतो. पण राजकीय दृष्ट्या आम्ही सक्षम होतो. कारण आम्हाला वडिलांच्या मागे राहणं खूप गरजेचं होतं. पण राजकारणात भावनिक होऊन चालत नाही. त्या काळात खूप शिकायला मिळालं याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही.
VIDEO : आदिती तटकरेंची संपूर्ण मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
फॅक्ट चेक
बॉलीवूड
भारत
Advertisement