एक्स्प्लोर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते; तसेच पुनर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत. मात्र भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात 11, 18, 23 ते 29 एप्रिल 2019 अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत: एकाच वेळी मतदान होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई न लावता इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी, असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, 82 सरपंचांच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुका, विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील एकूण जागा व मतदारांची संख्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे हा बदल केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे सहारिया यांनी स्पष्ट केले. 24 मार्च 2019 रोजी मतदान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदा: पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा). जिल्हा परिषदा: पुणे- देहुगाव-लोहगाव निवडणूक विभाग (ता. हवेली). पंचायत समित्या: बागलाण (जि. नाशिक)- पठावे दिगर निर्वाचक गण आणि मोहाडी (जि. भंडारा)- वरठी आणि पालोरा. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे- तीन, रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- चार,नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- तीन, नंदुरबार- पाच, पुणे- 20, सोलापूर- आठ, सातारा- 44, कोल्हापूर- तीन, औरंगाबाद-तीन, उस्मानाबाद- दोन, परभणी- एक, अमरावती- एक, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- दोन, नागपूर- दोन, वर्धा- 298, चंद्रपूर- एक आणि गडचिरोली- दोन. एकूण- 557. पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- एक, रायगड- 15, सिंधुदुर्ग- तीन, नाशिक- चार, धुळे- एक, जळगाव- दोन, अहमदगनर- चार, नंदुरबार- एक, पुणे- तीन, सोलापूर- तीन, सातारा- सहा, सांगली- दोन, कोल्हापूर- आठ, बीड- एक, नांदेड- सहा, उस्मानाबाद- दोन, परभणी- दोन, अकोला- तीन, यवतमाळ- एक, वाशिम- 6, बुलडाणा- दोन, नागपूर- सहा. एकूण- 82.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget