एक्स्प्लोर

धाराशिवमध्ये ठाकरेंना दणका बसणार? शिवसेनेचे ऑपरेशन टायगर, पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले संकेत

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केलं आहे.

Pratap Sarnaik : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केलं आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत प्रताप सरनाईकांनी दिले आहेत. त्यामुळं आता धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे कोण कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार? असा सवाल उस्थित केला जात आहे. 

नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मात्र, या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहे असे सरनाईक म्हणाले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जननेते दाखवून दिलं आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे जात आहे हे जनतेने दाखवले आहे. 80 जागा लढवून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याचे सरनाईक म्हणाले. यामुळं सर्वसामान्य जनतेने खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिलं आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्या तदेखील काही बदल झाला तर तुम्हाला वेगलं काही वाटायला नको असेही प्रताप सरनाईक म्हणाले. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 

राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, तानाजी सावंतांच्या नाराजीवर सरनाईकांचं वक्तव्य

राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते आदलाबदल होत असते असे म्हणत तानाजी सावंत यांच्या नाराजीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केलं. पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर होते. नाराजीबाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं आहे. पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांचा पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतला आहे. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार असल्याचे सरनाईक म्हणाले. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतल्याने मोठी चर्चा सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे. 

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा एक खासदार आणि दोन आमदार 

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा एक खासदार आणि दोन आमदार आहे. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील तसेच आमदार प्रवीण स्वामी हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहेत. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. तर उमरगा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे विजयी झाले होते. त्यांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला होता.  

महत्वाच्या बातम्या:

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेतNew Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळाRepublic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Embed widget