एक्स्प्लोर
Pulwama terror attack : देशभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन
पाकिस्तानला आणि जैश-ए-मोहम्मदला आता कोणत्याही चर्चेविना धडा शिकवा. अशा भावना देशातले लोक व्यक्त करत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातले लोक आक्रमक होत रस्त्यावर आले आहेत.
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामातल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लात 39 जवान शहीद झाले आहेत. तर 20 जवान गंभीर जखमी आहेत. गेल्या दोन दशकातला भारतीय सैन्यावरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
पाकिस्तानला आणि जैश-ए-मोहम्मदला आता कोणत्याही चर्चेविना धडा शिकवा. अशा भावना देशातले लोक व्यक्त करत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातले लोक आक्रमक होत रस्त्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी, पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन, पोस्टरवरुन बदल्याची मागणी करण्यात आलीय. मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी, पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन, पोस्टरवरुन बदल्याची मागणी करण्यात आलीय.
मुंबई युवा काँग्रेसने पाकिस्तानचा झेंडा जाळला
मुंबई युवा काँग्रेसच्या वतीनं मुंबईत आज आंदोलन करण्यात आलं. मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेस तर्फे शोकसभेच देखील आयोजन करम्यात आले होते. निरुपम आणि अशोक चव्हाण देखील या शोकसभेत सामिल झाले होते.
भिंडी बाजारात मुस्लीम धर्मियांकडून पाकच्या कृत्याचा निषेध
पुलवामाध्ये झालेल्या हल्ल्याचा मुंबईतल्या मुस्लीम धर्मियांना अतिशय कडक शब्दात विरोध केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ भिंडी बाजार बंद ठेवण्यात आला.
विलेपार्ले आणि घाटकोपरमध्ये पाकच्या भ्याड हल्ल्याचा निषेध
विलेपार्ले आणि घाटकोपरमध्ये सगळीकडेच पाकच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये जैश ए मोहंमद्दचा दहशतवादी आदिल महंम्मद डारचा पुतळा जाळण्यात आला. सरकारनं या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमधील वसमत शहरात कडकडीत बंद
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज वसमत शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. अमर रहे अमर रहे ,शहीद जवान अमर रहे, वंदे मातरम अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकड्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. वसमत,कुरूंदा,पांगरा शिंदेसह सेनगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जवानांना श्रद्धांजली वाहिली.
सोलापूरात पुलावामा दहशतवादी हल्ला निषेध
भारतावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या राष्ट्रवादीतर्फे वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढत निषेध व्यक्त करण्यात आला. सोलापुरातील पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ही धिंड काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.
तुळजापूरात मुस्लीम बांधवांकडून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली
तुळजापूरात मुस्लीम बांधवांनी मस्जिदमध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन शहीद जवानांच्या आत्म्यास शांति लाभो अशी प्रार्थना केली. तसेच मुस्लिम बांधवांनी काळी फित बांधून घटनेचा निषेध व्यक्त केला. तर अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या. तहसीलदार यांच्या माध्यमातूनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहरातील मुस्लीम बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत होता
यवतमाळात संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला
जम्मु काश्मिरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्लाच्या निषेधार्थ आज यवतमाळ येथे शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून घटनेचा निषेध केला. दरम्यान आता केंन्द्र सरकारने ठोस निर्णय घेऊन जगाच्या नकाशावरुन पाकिस्तानचे नाव मिटविण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी केले. याप्रसंगी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या घोषणांनी दत्त चौक परीसर दणाणून गेला.
नाशिक
नाशिकमध्ये शिवसैनिकांनी पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकचा झेंडा जाळला. तर दहशतवाद्याचा पुतळा जाळून पाकला धडा शिकवण्याची मागणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement