एक्स्प्लोर

केंद्र सरकारच्या प्रस्तावित करारामुळे दुधाचे दर सात रुपयांनी घसरणार?

केंद्र सरकार 21 जुलै रोजी रिजनल क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट (RCEP) याअंतर्गत थायलंड येथे पत्रात ट्रेंड अॅग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या करणार आहे.

पंढरपूर : राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरु असताना मोदी सरकार थेट 25 कोटी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या तयारीला लागल्याचा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या एका प्रस्तावित करारामुळे ही वेळ येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. केंद्र सरकार 21 जुलै रोजी रिजनल क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट (RCEP) याअंतर्गत थायलंड येथे पत्रात ट्रेंड अॅग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या करणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह 16 देश सहभागी होत असून आयात कर 0 ते 5 टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी इतर देश आग्रही आहेत. यामुळे न्यूझीलंडमधून अतिशय स्वस्तात येणाऱ्या दूध पावडरपासून बनणारे दूध देशात 7 ते 10 रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे. याच पद्धतीने खाद्य तेलावरही आयात शुल्क कमी केल्याने या सर्व देशातून येणाऱ्या तेलामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत येणार असल्याचा दावा बिजू यांनी केला. सध्या सुरु असलेल्या जुन्या करारामुळे मसाला पदार्थ उत्पादक, रबर उत्पादक शेतकरी संपला आहे. या नवीन करारामुळे दूध, साखर, सोयाबीन, गहू यांसह शेकडो प्रकारचे कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यवसायावर कुऱ्हाड येणार असल्याचा दावा बिजू यांनी केला. देशात सध्या 20 हजार टन दूध पावडर आणि 15 हजार टन बटर ऑईल मिसळून 75 हजार टन दूध बाजारात आल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. आता असलेला 40 टक्के आयात कर कमी केल्यास दूध केवळ 7 ते 10 रुपये प्रति लिटर इतक्या दराने मिळेल, असं बिजू यांचं म्हणणं आहे. याच पद्धतीने सध्या 55 टक्के आयात होणारं खाद्यतेल आयात कर कमी केल्यास मोठ्या प्रमाणात आयात होईल. आयात कर कमी करण्यासाठी सर्व मोठे देश भारतावर दबाव टाकत आहेत. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या कराराला होणाऱ्या विरोधानंतर स्थगिती दिली होती. पियुष गोयल या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी 21 जुलै रोजी थायलंडला जाणार आहेत. याला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ थायलंडमध्ये जाऊन विरोध करणार असल्याचं राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी सांगितलं. दरम्यान, यावर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रस्तावित कराराचा नेमका कोणत्या वस्तूंवर काय परिणाम होणार आहे, त्याचं नेमकं चित्र अस्पष्ट आहे. पण बिजू यांनी केलेल्या दाव्यामुळे दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget