चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी परीसराटतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या आरोपी पोलिसांनी अटक केलीय.
Gondia Crime News गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी रेल्वे स्टेशन परीसराटतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एक ईसम छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलीस दलात पोलीस शिपाई या पदाकरीता नोकरी लावुन देण्याकरीता पैसे घेवुन त्यांना नियुक्तीपत्र देणार आहे, अशी माहिती पोलिसांनी प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गोंदिया पोलिसांनी रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचुन नोकरीचे आमीष देवुन फसवणुक करणारा संशयित आरोपी अटक केली आहे. विलास नारायण गणवीर (वय 65 रा. किन्ही/मोखे, ता. साकोली, जिल्हा भंडारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो कागदपत्रासह आढळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक कऱण्यात आली आहे.
वर्दीसह बनावट कागदपत्रे पोलिसांच्या हाती
या प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीची विचारपूस केली असता, या चौकशीत त्याचेकडे असलेल्या बॅगमध्ये पोलीस अधीकाऱ्याची वर्दी, बनावट नेमप्लेट, पोलीस अधीकाऱ्याचे बनावट ओळखपत्र, छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती उमेदवार प्रवेशपत्र, मुख्य वैद्यकीय अधीकारी छत्रपती संभाजीनगर आणि पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, यांचे शिक्का असलेले कागदपत्रे, विद्यार्थ्याचे शालेय मुळ कागदपत्रे, टि.सी. मार्कशिट, डोमाशाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैद्यता प्रमाणपत्र इत्यादि साहित्य बॅगमध्ये मिळाले आहे.
संशयित आरोपीविरुध्द अशाप्रकारचे भंडारा, गोंदिया, चंद्रपुर जिल्ह्यात विवीध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याविषयी पुढील तपास डूग्गीपार पोलीस करीत आहेत. मात्र हे प्रकरण उजेडात येताच विदर्भातील अनेक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
फसवणुकीचे 8-10 गुन्हे, पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुढे आलेल्या माहितीनुसार यात पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देतो म्हणून संशयित आरोपीने गोंदियात एका व्यक्तीकडून 5 हजार रुपये घेतल्याची माहिती आहे. तर सुरवातीला त्याने नोकरीसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तर अशाच प्रकारचे 8-10 गुन्हे गोंदिया जिल्हासह चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या या चारही जिल्ह्यात दाखल झालेले फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.
तर नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कुणी नोकरीच्या नावावर पैसे मागण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले
हे ही वाचा