Thane Bribe: ठाण्यात पीडब्लूडीच्या ऑडिटरला अटक, ठेकेदाराकडून घेत होता 15 हजारांची लाच
Thane Bribe: महाराष्ट्राच्या (Maharashtra) ठाणे जिल्ह्यात (Thane) एका कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला एसीबीनं (Anti Corruption Bureau) बेड्या ठोकल्या आहेत.
Thane Bribe: महाराष्ट्राच्या (Maharashtra) ठाणे जिल्ह्यात (Thane) एका कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या पीडब्लूडीच्या ऑडिटरला एसीबीनं (Anti Corruption Bureau) बेड्या ठोकल्या आहेत. एसीबीनं स्वत: याबाबत माहिती दिलीय. कंत्राटदारानं मुंबईतील पोलीस रुग्णालयात डायलिसिस सेंटर बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या कामसाठी आरोपीनं ठेकेदाराकडून 40 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीनं दुसऱ्या निविदेशी संबंधित काम करण्यासाठी ठेकेदाराकडून 15 हजारांची मागणी केली. याबाबत ठेकेदारांनं संबंधित अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडं तक्रार दिली. त्यानंतर एसीबीनं सापळा रचून अधिकाऱ्याला रंगे हाथ पकडलं.
गणेश दशरथ ठाकरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा मुंबई येथे कार्यकारी अभियंता कार्यालयात वरिष्ठ विभागीय ऑडिटरला म्हणून काम करतो. त्यांनी ठाण्यातील एका ठेकेदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय. आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी एसीबीनं अधिक चौकशी करीत आहे.
ठाणे जिल्ह्यात याआधी एसीबीनं औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंताला अटक केली होती. कल्याण पाटील असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. सीबीडी बेलापूर परिसरात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्यानं पुलाला रंग आणि खारघर रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक साफ करण्यासाठी ठेकेदाराकडून 30 हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर एसीबीच्या पथकानं त्याला 30 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं.
हे देखील वाचा-
- Aurangabad : चंद्रकांतदादा, उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका, अजित पवारांचा हल्लाबोल
- Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा निर्णय
- Municipal Corporation Election: आगामी 10 महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकार पुढे ढकलण्याच्या तयारीत...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha