Deepak Kesarkar : मोती तलावाकडे 4 दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ; सावंतवाडीत दीपक केसरकरांविरोधातील बॅनरची चर्चा, आता बदल हवो तर आमदार नवो…!
या बॅनरवर मालवणी भाषेत दीपक केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे लिहिले आहे. दीपक केसरकर यांनी अनेक घोषणा केलेले प्रकल्प हवेत कसे विरले याची कुंडलीच या बॅनरच्या माध्यमातून मांडली आहे.
Deepak Kesarkar : सावंतवाडी मतदारसंघामध्ये आगामी विधानसभेच्या तोंडावर दीपक केसरकर यांच्या विरोधात मालवणी भाषेत लावण्यात आलेल्या बॅनरबाजी जोरदार चर्चा सुरू आहे. अज्ञाताकडून हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर मालवणी भाषेत दीपक केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे लिहिले आहे. दीपक केसरकर यांनी अनेक घोषणा केलेले प्रकल्प हवेत कसे विरले याची कुंडलीच या बॅनरच्या माध्यमातून मांडली आहे. गेली 15 वर्ष केसरकरांनी काय काय घोषणा केल्या हे या बॅनरमधून मांडली आहे.
काय म्हटलं आहे बॅनरमध्ये?
प्रिय दिपकभाईनू,
कसा काय ? बरा हा मा ?
भाईनू, आम्ही सावंतवाडीकर तुमका आपले समजा होतो पण दर येळाक आमच्या
भावनांची खेळ केलास मवो. इकास, इकास आणि इकास.... पंधरा वर्षा निस्ते कडकडतहास. पण भाईनू, मोती तलावाकडे ४ दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ ! मागच्या इलेक्शनच्या टायमाक सांगलास सेटटॉप बॉक्सचो कारखानो आणतय, पोरग्यांका नोकरी गावतली. आशेन तुमका मता घातलव तुमचो कारखानो काय यॆवक नाय. तुमी गायब आणि कारखानोसुद्धा गायब. आसा तो सेट्टॉप बॉक्स रीचार्ज मारून घामटा भायर सरला.
त्याच्च्या आधीच्या इलेक्शनच्या टायमाक सांगलास चष्म्याचो कारखानो आणतय म्हणान.
वाट बघून बघून आमच्या चष्म्याचो नंबर वाडलो, पण तुमची कारखानो काय येवक नाय ! आता यंदाच्या इलेक्शनच्या तोंडार सांगतास जर्मनीक व्हरतय आणि नोकरी देतय म्हणान. भाईन्, हयत्त्या हय १५ वर्षा तुमका शक्य होवक नाय जर्मनीत काय दिताल्यास ? कशाक ओ आमच्या पोरग्यांका फसवतास ?
ओ भाई, सावंतवाडीत टॉय ट्रेन हाडतंय म्हणान सांगितलेलात... आठवता ? टॉय ट्रेन सोडा ओ. पण सावंतवाडी टर्मिनलचा भूमिपूजन केलास पण पुढे काय्येक होव्क नाय,
थय सुधा फसयलास !
भाईन, नरेंद्र डोंगरार टी हाऊस आणतय म्हणान पत्रकार परिषद घेऊन सांगललास आठवता ?
दी आसत. हाऊस मात्र खय दिसत नाय !
भाईन्, २०१९ साली भूमिपूजन केलेल्यात ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आठवता ? अजून एक ईट पण रचाक नाय! आता म्हणतास वेळागरचा ताजचा भूमिपूजन करतय म्हणान. भाईन्, ताजसाठी १९९५ सालात धयच्या लोकांचे जमिनी त्यावेळच्या सरकारान घेतले.
तुम्ही २००९ पासून आमदार आसात हयचे. ८ वर्षा मंत्री वर आणि
तेतूर ४ येळा विकासासाठी म्हणान पक्ष बदलात !
जा तुमका सत्तेत असताना १५ वर्ष जमाक नाय ता आता कसा होताला ?
वो ता सोडा भाईनू... दहशतवाद दहशतवाद म्हणान २०१४ मधे आमका घाबरवलास,
आम्ही भियान तुमका मता घातलव. १० वर्षा नंतर बगतव
विरोधकांच्या रडारवर दीपक केसरकर
दुसरीकडे, लाडक्या बहिणीसाठी पैसे कमी पडू नये, यासाठी अन्य सर्व योजनांचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हा आरोप खरा आहे की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या (School Uniform) दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी शाळांमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचा दर्जा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गणवेशाच्या दर्जावरून हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या