एक्स्प्लोर

Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.

Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत घोषणा केली. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा जन्मदिवस दिवस आहे. याचं औचित्य साधून 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनातर्फे 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन जाहीर केलं. या निमित्ताने सरकराकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ठेवला होतो, जो सरकारने स्वीकारला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा होणार!

मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान असून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती."

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारचा हा निर्णय म्हणजे काँग्रेसला उत्तर आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

स्वातंत्र्यवीरांवरुन राजकारण पेटलं

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यांच्या देशभक्तीवरुन वाद निर्माण झाले आहेत. सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती आणि सेल्युलर जेलमधून सुटल्यानंतर ते पेन्शनवर होते, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर भाजप पक्ष आक्रमक झाला. भाजपने राज्यभरात स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढली. तसंच ठाकरे गटावरही हल्लाबोल केला होता. ठाकरे गटावर हल्लाबोल करत भाजपने वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत कसे राहू शकता, असा सवाल भाजपने विचारला होता. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. तर राहुल गांधींनी अशी वक्तव्ये करणं टाळावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
31 वर्षाचा युवा, भारतातील सर्वात तरुण श्रीमंत; अरविंद श्रीनिवास AI कंपनीचा मालक, किती आहे संपत्ती?
31 वर्षाचा युवा, भारतातील सर्वात तरुण श्रीमंत; अरविंद श्रीनिवास AI कंपनीचा मालक, किती आहे संपत्ती?
Ind Vs Pak Asia Cup Final: गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
Minimum Balance Rule : आणखी एका बँकेकडून मिनिमम बॅलन्सचा नियम रद्द, ग्राहकांना दिलासा, दंड रद्द, MAB रदद करणाऱ्या बँकांची यादी
आणखी एका बँकेकडून मिनिमम बॅलन्सचा नियम रद्द, ग्राहकांना दिलासा, MAB नियम रदद करणाऱ्या बँकांची यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
31 वर्षाचा युवा, भारतातील सर्वात तरुण श्रीमंत; अरविंद श्रीनिवास AI कंपनीचा मालक, किती आहे संपत्ती?
31 वर्षाचा युवा, भारतातील सर्वात तरुण श्रीमंत; अरविंद श्रीनिवास AI कंपनीचा मालक, किती आहे संपत्ती?
Ind Vs Pak Asia Cup Final: गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
Minimum Balance Rule : आणखी एका बँकेकडून मिनिमम बॅलन्सचा नियम रद्द, ग्राहकांना दिलासा, दंड रद्द, MAB रदद करणाऱ्या बँकांची यादी
आणखी एका बँकेकडून मिनिमम बॅलन्सचा नियम रद्द, ग्राहकांना दिलासा, MAB नियम रदद करणाऱ्या बँकांची यादी
Pune News: पुणे तिथे काय उणे; वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली खराब रस्त्यांची पूजा
पुणे तिथे काय उणे; वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली खराब रस्त्यांची पूजा
Manoj Jarange Patil : ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
अश्वदेवं... वंशावळ सुरू राहते, म्हणत दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्यांचे पूजन; चर्चा तर होणारच
अश्वदेवं... वंशावळ सुरू राहते, म्हणत दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्यांचे पूजन; चर्चा तर होणारच
Manoj Jarange Patil: मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक सुद्धा व्हावं लागेल, नेता हात जोडून समोर उभा राहील; नारायणगडावरून मनोज जरांगेंची भावनिक साद
मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक सुद्धा व्हावं लागेल, नेता हात जोडून समोर उभा राहील; नारायणगडावरून मनोज जरांगेंची भावनिक साद
Embed widget