एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कशेडी घाटात पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली, चार पर्यटक जखमी

कशेडी घाटात कोकणातून पुण्याच्या दिशेला निघालेल्या पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये पुणे येथील चार पर्यटक जखमी झाले आहे.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात कोकणातून पुण्याच्या दिशेला निघालेल्या पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये पुणे येथील चार पर्यटक जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलिसांनी दीडशे फूट खोल दरीत उतरून मदतकार्य करत या जखमी पर्यटकांना बाहेर काढून पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. हा अपघात आज शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

पुणे जिल्ह्यातून कोकणात पर्यटनासाठी आलेले पर्यटक हे आपल्या मारुती कारने आज पुण्याच्या दिशेने परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. कशेडी घाटातील पोलादपूरच्या बाजूला प्रतापगड दर्शन पॉईंट नजीक एका अवघड वळणावर कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. ज्यावेळी हा अपघात घडला नेमके त्याचवेळी महाड येथील केबल नेटवर्कचा व्यवसाय करणारे रोशन बबन कदम हे देखील याच घाटातून प्रवास करत होते व त्यांच्या समोरच पर्यटकांची कार दरीत कोसळली.केबल व्यावसायिक यांनी क्षणाचाही विलंब न करता या घटनेची माहिती कशेडी येथील पोलिसांना दिली.

यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडकर, पोलीस हेडकोन्स्टेबल समेल सुर्वे.धोपावकर, जाधव, पोलीस शिपाईचिकणे,शेलार,दुर्गावळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ महेश व सहदेव आणि पोलादपूरचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीडशे फूट खोल दरीत उतरून मदतकार्य केले व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले .या अपघातामध्ये विशाल नंदू वरूते (वय 24),अजिंक्य नंदू वरूते (वय 28), तुषार नंदू वरूते (वय 20), गणेश पर्वते गाडे (वय 35) हे चार पर्यटक जखमी झाले. यातील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात नेहमीच अपघात होत असतात. या घाटात जेव्हा कधी अपघात होतात त्यावेळी कशेडी पोलीस चौकीचे सर्वच पोलीस कर्मचारी हे देवदुताप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातात. जर आज कशेडी घाटातील दरीमध्ये कोसळलेल्या अपघाताबद्दल महाड येथील केबल नेटवर्कचा व्यवसाय करणारे रोशन कदम यांनी हा अपघात घडताना पहिला नसता तर मात्र दीडशे फूट दरीत कोसळलेल्या या कारचा थांगपत्ता उद्या सकाळपर्यंत कोणालाच लागला नसता. रोशन कदम यांनी हा दुर्दैवी अपघात पाहिला आणि याची माहिती कशेडी पोलिसांना दिली व अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळण्यास शक्य झाले. कशेडी पोलिसांनी केलेल्या धाडसी मदतकार्यामुळे आज पुन्हा एकदा महामार्ग पोलिसांचे देवदुताचे रूप अपघातग्रस्तांना अनुभवायला मिळाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget