एक्स्प्लोर

Nagpur IIM : 'नागपूरचं आयआयएम शैक्षणिकच नव्हे तर जीवन घडवणारं केंद्र होईल' : राष्ट्रपती

नागपूरच्या आयआयएम IIM Nagpur नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन व लोकार्पण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांच्या उपस्थितीत पार पडले.

IIM Nagpur : इंडियन इॅन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या (IIM Nagpur) नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन व लोकार्पण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांच्या उपस्थितीत पार पडले.  IIM मध्ये उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतीसोबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान,  राज्याचे मंत्री नितीन राऊत, मंत्री सुभाष देसाई यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. 

यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, आयआयएम नागपूर हे केवळ शैक्षणिक केंद्रच नाही तर जीवन घडवणारं केंद्र ठरेल. मला विश्वास आहे की, नागपूर आयआयएमचं वातावरण विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठीच नव्हे तर रोजगार देण्याइतकं सक्षम बनवेल, असं राष्ट्रपती म्हणाले.  

राष्ट्रपती म्हणाले की, नागपूर आयआयएम महिलांच्या प्रगतीसाठी देखील योगदान देईल. हेच सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमीला खरं नमन असेल. स्पेशल इकोनामिक झोनमध्ये असलेल्या नागपुरात आयआयएम सारखी संस्था असणं हे देशातील पहिलं उदाहरण आहे.  महाराष्ट्र नेहमी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचं केंद्र राहिलं आहे. देशाच्या संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षा भूमी देखील नागपूरच आहे, असंही राष्ट्रपती म्हणाले.  

काहींनी वाद निर्माण केले- देवेंद्र फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षांपूर्वी देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनुष्य बळ तयार करण्यासाठी आयआयएमची संख्या वाढविण्याचे निर्णय घेतले. महाराष्ट्रात आयआयएम नागपुरात करण्याचे ठरले. काहींनी वाद निर्माण केले की प्रस्ताव औरंगाबाद आणि नाशिकचे होते, मात्र प्रस्ताव फक्त नागपूरचा होता. लगेच कामाला सुरुवात झाली. 150 एकर जागा उपलब्ध करून दिली.. पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आणि आज राष्ट्रपती त्याचे उद्घाटन करत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्याकडे आज एक पाऊल पडत आहे.. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी आयआयएम नागपूर सोबत असल्याने चांगले परिणाम आयआयएम नागपूर देईल असा विश्वास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर आयआयएमसाठी राज्य शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस

नागपूरच्या मिहान परिसरात 132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या 665 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असून पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. 132 एकरात विस्तारलेल्या इमारत व परिसरात 665 विद्यार्थी व्यवस्थापन विषयाच्या विविध शाखेमध्ये शिक्षण घेत असून या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या असून अद्यावत प्रशिक्षण यंत्रसामग्रीने सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार आहे. 2015 ला सुरु झालेल्या या संस्थेला आता या नव्या कॅम्पसमुळे नवी झळाळी मिळाली आहे. 

अत्याधुनिक क्लास रूम्स :

आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत. या शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. आयआयएम नागपूरचे जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारच्या सोयी आहेत. 

जागतिक विद्यापीठांसोबत भागिदारी - 

देशाचे अगदी मध्यवर्ती शहर असणारे नागपूर आयआयएम या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे. इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट युनिर्व्हसिटी ऑफ लिले फ्रान्स, वेस्ट मिनिस्टर बिझनेस स्कूल, युनिर्व्हसिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर इग्लंड, युनिर्व्हसिटी ऑफ मेमफीस, अमेरिका,इन्स्टिट्यूट मांइन्स टेलिकॉम, फ्रॉन्स, कोफेनहेगन बिझनेस स्कुल डेनमार्क, स्कूल ऑफ स्टॅटेजिक मॅनेजमेंट जपान आदी विद्यापींठासोबत या संस्थेचा सामजस्य करार झाला आहे. 

2015 साली आयआयएम नागपुरात सुरु

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या नागपूरचे पहिले सत्र जुलै 2015 पासून सुरु झाले होते. त्यावेळी स्वतःची इमारत नसल्याने विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेच्या म्हणजेचं (व्हीएनआयटी) येथील कॅम्पसमध्ये आयआयएमचे क्लासेस सुरू करण्यात आले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget