एक्स्प्लोर
Advertisement
माझ्या टेबलवर फाईल असती, तर कधीच मराठा आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
बीड: "माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. पण हे प्रकरण कोर्टात असल्याने विलंब होत आहे," असं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, ती फाईल ना माझ्या टेबलवर आहे, ना मुख्यमंत्र्यांच्या, हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे विलंब होत आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला वाकायला सांगणार नाही. मी तुमची दूत बनणार आहे. तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत जाणार आहे. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते की जर माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर मी क्षणाचा विलंब न करता आरक्षण दिले असते. पण हे प्रकरण कोर्टात असल्याने विलंब होत आहे.”
"आज मी तुम्हाला एक शपथ देण्यासाठी आले आहे. जीव गमावू नका..माझ्या वाघांनो जीव देऊ नका..जीव घ्या, आमचा जीव घ्या.", असं पंकजा मुंडे म्हणाल्या, तसेच, आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे आश्वासनही पंकजा मुंडेंनी दिले.
आरक्षण वादावर विलासरावांचा तोडगा, 10 वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल
"आंदोलनात चूक नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर यासंबंधी गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. तसंच मेगाभरती संदर्भात अनेक मराठा युवकांना नोकरी लागेल. जे कुणबी मराठा आहेत त्यांना नोकरी लागणार आहे", असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार पातळीवर हालाचाली सुरु झाल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक होईल. बैठकीत आंदोलनाच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री मंत्र्यांकडून घेणार आहेत. दिवसेंदिवस मराठा आंदोलन चिघळत असल्यामुळे त्यावर या बैठकीत काही तोडगा निघतो का , हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
अपक्ष आमदारांचा इशारा
मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ असा निर्धार राज्यातल्या सहा अपक्ष आमदारांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत, मात्र त्यांना पदावरुन दूर केलं तर आपण सरकारमध्ये राहणार नाही, असा इशारा अमरावतीच्या बडनेरातील अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. अपक्ष आमदारांमध्ये त्यांच्यासोबत गणपतराव गायकवाड, हिरालाल चौधरी, किशनराव जाधव, माधवराव फड यांचाही सहभाग असल्याचा राणा यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे
मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा दिला आहे. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वार राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे आमदार हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
दुसरीकडे औरंगाबादेतील वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला.
छावा संघटना मागासवर्गीय आयोगाच्या भेटीला
छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी आयोगाने पावले उचलावीत असं निवेदन त्यांनी आयोगाचे सचिव अजय कुमार यांना संघटनेच्या वतीनं दिलं.
संबंधित बातम्या
आर्थिक निकषावर आरक्षण? दिल्लीत प्राथमिक स्तरावर चर्चेला सुरुवात
दिल्लीत मराठा एकवटले, महाराष्ट्र सदनात मराठा मोर्चा
झेपत नसेल तर सत्तेतून पायऊतार व्हा, मराठा मोर्चावरुन राज ठाकरेंचा इशारा
आरक्षण वादावर विलासरावांचा तोडगा, 10 वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल
मराठा आरक्षण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा: सुरेश धस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement