(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election 2022 : पक्षनेतृत्वानं आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि जिंकूही, चंद्रकांत पाटलांना विश्वास
पक्षनेतृत्वानं आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि ती जिंकूही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला आहे.
Chandrakant Patil on Rajya Sabha Election 2022 : सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेनं राज्यसभेची सहावी जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपनेही देखील आपला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पक्षनेतृत्वानं आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि ती जिंकूही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी पक्षानं आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ती जागा जिंकण्याचा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
भाजपचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता राज्यसभा निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरीक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई होईल असे पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. परंतू राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढवण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो असेही पाटील म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल देखील पाटील यांना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी मा काही बोलणार नसल्याच ते म्हणाले.
न्यायालयाचा दरावाजा सर्वांसाठी खुला
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील या उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर कारवाई झाली हे विसरता येणार नसल्याचे पाटील म्हणाले. न्यायालयाचा दरावाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी असे पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: