एक्स्प्लोर
परवानगी शिवाय गाव बंद केल्यास 5 कोटींचा दंड, अकलूज ग्रामसभेचा निर्णय
पंढरपूर: वारंवार होणारे बंद आणि यातून लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास यावर दिलासा देणारा एक निर्णय अकलूजच्या ग्रामसभेने घेतला आहे. या निर्णयानुसार, यापुढे गावाच्या परवानगी शिवाय गाव बंद केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून 5 कोटी रुपयांचा दंडही वसुल केला जाणार आहे.
वारंवार पुकारले जाणारे बंद यातून होणारा सर्वसामान्यांना त्रास आणि राष्ट्रीय संपत्तीचे आर्थिक नुकसान याकडे कोणतेच पक्ष, संघटना गंभीरपणे पाहात नाहीत. या बंदमुळे समाजात तेढदेखील वाढत चालल्याचे चित्र आहे. मात्र अकलूज सारख्या 45 हजार लोकवस्ती असलेल्या एका छोट्या गावाने असा क्रांतिकारक निर्णय घेऊन एक चांगले पाऊल टाकले आहे.
अकलूज येथे मोठी बाजारपेठ आहे. येथील मोठे होलसेल व्यापारी, कापड दुकानदार व इतर मोठ्या व्यापाऱ्यांमुळे मोठी वर्दळ असते. मात्र, वारंवार बंदच्या नावाखाली होणाऱ्या दगडफेकीमुळे व्यापाऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. यातूनच काही व्यापाऱ्यांनी अकलूज येथील व्यापार हलविण्यापर्यंत तयारी केली होती.
याचा उद्रेक गावातील ग्रामसभेत होऊन बंद तरी टाळा किंवा आम्हाला व्यापार तरी हलवू द्या, अशी मागणी सर्वच लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी केली. यावर ग्रामस्थांच्या संमतीने एक समिती नेमून त्याच्या परवानगीनेच यापुढे कोणताही बंद करायचा असा निर्णय घेतला आहे.
या समितीमध्ये सर्व संघटना, पक्ष यांच्यासह लहान-मोठे व्यापारी यांचा समावेश असणार आहे . ही समिती बंदचे कारण संयुक्तिक असेल तर अशा बंदसाठी परवानगी देईल, मात्र गावाच्या परवानगी शिवाय जर कोणी बंद पुकारला तर त्याकडून 5 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वसूल करण्याचे ठरविण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement