एक्स्प्लोर
Advertisement
मला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती : पंकजा मुंडे
साहेबांचा राख सावडण्याचा दिवस होता, त्याच दिवशी मला मुंडे साहेबांच्या जागी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला त्यांच्या जागेवर केंद्रात मंत्रिपदाची ऑफर होती, असं गुपित राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं. विशेष म्हणजे बीडमधील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंकजा यांनी हे विधान केलं.
तुमचे-माझे आधारवड असलेले मुंडे साहेब अचानक गेले, अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश शोकसागरात बुडाला होता. साहेबांचा राख सावडण्याचा दिवस होता, त्याच दिवशी मला मुंडे साहेबांच्या जागी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य करुन पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीचे असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं.
आता तर केंद्रात ग्रामविकास मंत्रिपद मिळणार होतं, मात्र मीच नकार दिला, असं विधान करुन पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संबंधित बातम्या
मंत्रिमंडळातील गृह खातं माझं आवडतं खातं : पंकजा मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement