एक्स्प्लोर
मला कोणतीही लाट माहीत नाही, मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे : उदयनराजे भोसले
मला कोणतीही लाट माहीत माहीत नाही, मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे, असे म्हणत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
पुणे : मला कोणतीही लाट माहीत माहीत नाही, मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे, असे म्हणत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला
उदयनराजे निवडणुकीबाबत म्हणाले की, "मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपण फक्त समाजकार्य करत राहायचं. मला कोणतीही लाट माहीत माहीत नाही, मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे. असे बोलून उदयनराजेंनी पुन्हा एकदा साताऱ्यातून निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला."
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करुन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यामधला वाद मिटवून दोघांचे मनोमिलन घडवून आणले, त्याबाबत उदयनराजेंना विचारले असता उदयनराजेंनी उलट सवाल केला की, "शिवेंद्रराजे आणि माझ्यात मनोमिलन होण्यासाठी आमचं तुटलं कधी होतं?"
पाहा शिवेंद्रराजेंबाबत उदयनराजे काय म्हणाले?
दरम्यान उदयनराजे यांनी आज खेड शिवापूरजवळच्या दर्ग्याला भेट दिली. आगामी निवडणुकीसाठी उदयनराजेंनी या दर्ग्यात प्रार्थना केली.
संबधित बातमी : शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement