एक्स्प्लोर
मी गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार : महादेव जानकर
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण? या वादात आता राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी उडी घेतली आहे. वारसदाराच्या या चढाओढीत मीच पास होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण? या वादात आता राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी उडी घेतली आहे. वारसदाराच्या या चढाओढीत मीच पास होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड येथे आयोजित 'आठवणीतले गोपीनाथ मुंडे' या कार्यक्रमात महादेव जानकर बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यादेखील उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा खरा वारसदार मीच असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर जानकर यांनी निशाणा साधला. "ज्या व्यक्तींना गोपीनाथ मुंडेंनी विरोध केला त्यांच्याकडे जाऊन हे वारसदार कसे काय होऊ शकतात?" असे जानकर म्हणाले. "व्हॉट्सअॅपवर कोणी काहीही पसरवू दे, पंकजा आणि प्रीतम मुंडे याच निवडून येणार आहेत. त्यांना कोणाचा बाप पाडू शकत नाही. गोपीनाथ मुंडेंचा विचार पुढे नेणारे आम्हीच खरे वारसदार आहोत", असे जानकर म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण























