एक्स्प्लोर
मी ‘जोशी’आहे, ‘ज्योतिषी’नाही, अयोध्येच्या प्रश्नावर मनोहर जोशींचं उत्तर
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जोशी उपस्थित होते. तेव्हा,प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मुंबई: अयोध्येबद्दल आता सांगणे मला कठीण आहे, कारण मी ‘जोशी’आहे ‘ज्योतिषी’नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी ठाण्यात केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जोशी उपस्थित होते. तेव्हा,प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान मनोहर जोशींनी बाळासाहेबांचे स्मारक मुंबईच्या महापौर निवास स्थानामध्येच होणार असल्याची ग्वाही दिली.
प्रस्तावित राम मंदिराच्या मुद्यावरून सर्वत्र रान पेटवले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी अवघी सेना कामाला लागली आहे. याबाबत मनोहर जोशी यांना विचारले असता, त्यांनी नेहमीच्या शैलीत सावध भूमिका मांडली. मी जोशी आहे,ज्योतिषी नाही. तेव्हा,अयोध्येबाबत आताच सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तरीही येत्या 25 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिराची वीट रचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत अडथळे आणणारे मराठीच आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच महापौर निवास स्थानीच बाळासाहेबांचे देशातील सर्वोत्तम स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement