एक्स्प्लोर
भरदिवसा शिक्षिकेची कुऱ्हाडीने वार करुन शाळेतच हत्या, आरोपी पती फरार
पत्नीची हत्या करुन फरार झालेल्या आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

गोंदिया : शाळेत घुसून पतीने शिक्षिका पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियामध्ये घडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील इर्रीटोला गावात पतीने कुऱ्हाडीने वार करत आपल्या शिक्षिका पत्नीला शाळेतच संपवलं. प्रतिभा डोंगरे असे मृत शिक्षिकेचं नाव आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संबंधित शिक्षिका शाळेत गेली. तिच्यापाठोपाठ तिचा पती दिलीप डोंगरे हा शाळेच्या कार्यालयात आला आणि त्याने पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत डोकं आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. शाळेतील कर्मचाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आरडाओरडा केला. मात्र आरोपी दिलीप डोंगरे संधी साधत पसार झाला. पत्नीची हत्या करुन फरार झालेल्या आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक























