एक्स्प्लोर

रुग्णालयात असूनही सत्तास्थापनेसाठी राऊतांची लढाई सुरुच; म्हणाले...

संजय राऊत रुग्णालयात असल्यामुळं ते आता शिवसेनेची भूमिका मांडणार नाहीत. असे वाटत असतानाच त्यांनी सकाळी ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेची भूमिका परखडपणे मांडणारे फायरब्रँड नेते संजय राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. अशाही परिस्थितीत त्यांनी आपली भूमिका मांडण्याचं काही सोडलेलं दिसत नाही. हरिवंशराय बच्चन यांना क्रेडीट देऊन कविता पोस्ट करुन "हम होंगे कामयाब, जरूर होंगे, असे ट्विट त्यांनी सकाळी केले आहे. सत्तास्थापनेच्या या खेळात शिवसेनेचे बिनीचे शिलेदार खासदार संजय राऊत यांच्यावर काल (10 नोव्हेंबर) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राऊत यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये 2 ब्लॉक होते. राऊत यांच्यावर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. राऊत यांच्या रक्तवाहिनीमध्ये तीन स्टेन टाकण्यात आले आहेत, असे त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सांगितले आहे. 4 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळणार असून पुढील 3 दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. संजय राऊत रुग्णालयात असल्यामुळं ते आता शिवसेनेची भूमिका मांडणार नाहीत. असे वाटत असतानाच त्यांनी सकाळी ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' बच्चन. हम होंगे कामयाब..जरूर होंगे.., असे ट्विट राऊत यांनी केले आहे. दरम्यान, पोस्ट केलेली कविता हरिवंशराय बच्चन यांची नसून सोहनलाल द्विवेदी यांची आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. अनेकांना असे वाटते की हरिवंशराय बच्चन यांची ही रचना आहे, मात्र, स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे ही रचना सोहनलाल द्विवेदी यांची असल्याचे सांगितले आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है जा जा कर खाली हाथ लौटकर आता है मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती असफलता एक चुनौती है, स्वीकार करो क्या कमी रह गई, देखो और सुधार करो जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती अभिनेता अमिताभ बच्चन यांची फेसबुक पोस्ट : - संबंधित बातम्या : संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी, लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया "अन्यथा शिवसेनेचा गेम भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून केला हे सिद्ध होईल" सत्तास्थापनेसाठी भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून निमंत्रण सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी मुदतवाढीला राज्यपालांचा नकार, वेळ नाकारली दावा कायम : आदित्य ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget