एक्स्प्लोर
संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी, लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली
मुंबई : सत्तास्थापनेच्या या खेळात शिवसेनेचे बिनीचे शिलेदार खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राऊत यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये 2 ब्लॉक होते. राऊत यांच्यावर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. राऊत यांच्या रक्तवाहिनीमध्ये तीन स्टेन टाकण्यात आले आहेत, असे त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सांगितले आहे. 4 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळणार असून पुढील 3 दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे.
अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.
संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर निशाणा साधला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते दररोज पत्रकार परिषद घेत होते. तसेच पक्षाची भूमिकाही घडणाऱ्या घडामोडींनंतर माध्यमांसमोर मांडत होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील संजय राऊत यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नाशिक
भारत
Advertisement