एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी मुदतवाढीला राज्यपालांचा नकार, वेळ नाकारली दावा कायम : आदित्य ठाकरे
मात्र राज्यपालांनी आमची वेळ नाकारली असली तरी त्यांनी आमचा दावा नाकारलेला नाही. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आणि जे आम्हाला पाठिंबा देत आहेत ते पक्ष आम्ही पुन्हा इथं येऊ, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ही प्रक्रिया पुढे सुरूच राहणार आहे. शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. स्थिर सरकार देणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
मुंबई : आम्हाला काल सायंकाळी राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी आमंत्रण मिळाले. सत्तास्थापना करण्यासाठी आम्ही दावा केला आहे. इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्याशी प्राथमिक बोलणी करून काही तात्विक चर्चा करण्यासाठी आम्हाला किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा आहे. यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी तो वेळ नाकारला आहे, असे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यपालांशी राजभवनावर चर्चा केल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला राज्यपालांचे पत्र मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची पत्रं आम्हाला मिळाली आहेत. मात्र इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्याशी प्राथमिक बोलणी करून काही तात्विक चर्चा करण्यासाठी आम्हाला किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा असतो. यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी तो वेळ नाकारला. आम्हाला राज्यपालांचं पत्र आल्यानंतर आम्ही 24 तासात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली. या दोन्ही पक्षांमध्ये देखील आमच्यासोबत येण्याबाबत बोलणी सुरु झाली आहे. आमची वेळ साडेसात वाजेपर्यंत असल्यामुळे आम्ही पावणेसात वाजता इथे पोहोचलो. आम्ही राज्यपालांना भेटून सांगितले की सत्तास्थापना करण्याची इच्छा व्यक्त केली, असे ते म्हणाले.
मात्र राज्यपालांनी आमची वेळ नाकारली असली तरी त्यांनी आमचा दावा नाकारलेला नाही. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आणि जे आम्हाला पाठिंबा देत आहेत ते पक्ष आम्ही पुन्हा इथं येऊ, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ही प्रक्रिया पुढे सुरूच राहणार आहे. शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. स्थिर सरकार देणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अजूनही दिलं नाही. राज्यपालांनी वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement