एक्स्प्लोर
गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल?
प्रत्येकालाच निकालाच्या सुपरफास्ट अपडेट पाहण्याची उत्सुकता असेल. एबीपी माझाच्या वेब टीमने यासाठी खास तयारी केली आहे.

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज (18 डिसेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येकालाच निकालाच्या सुपरफास्ट अपडेट पाहण्याची उत्सुकता असेल. एबीपी माझाच्या वेब टीमने यासाठी खास तयारी केली आहे. एबीपी माझावर सकाळी 6 वाजल्यापासून दिवसभर तज्ज्ञांच्या विश्लेषणासह हा निकाल पाहता येईल, ज्यामध्ये गुजरातच्या 182 आणि हिमाचलच्या 68 जागांचा समावेश आहे. निकालाची लाईव्ह स्ट्रिमिंगही तुम्हाला पाहता येईल. शिवाय निकालाची अचूक आकडेवारी क्षणाक्षणाच्या अपडेटसह प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल. निकाल कुठे-कुठे पाहता येईल? टीव्हीसोबतच तुमच्या स्मार्टफोनवर बातमी, फोटो आणि व्हिडिओ स्वरुपात तुम्हाला हा निकाल पाहता येईल. शिवाय देशातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टारवरही एबीपी माझा पाहता येईल. गुगल प्ले स्टोअरवरुन एबीपी लाईव्ह हे अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि पंजाबी या सहा भाषांमध्ये निकाल पाहता येईल. शिवाय #ABPResults या हॅशटॅगसह तुम्ही ट्वीटही करु शकता. लाईव्ही टीव्ही - http://abpmajha.abplive.in/live-tv मराठी वेबसाईट - http://abpmajha.abplive.in सोशल मीडियावर निकाल कसा पाहाल? फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर तुम्हाला हा निकाल लाईव्ह पाहता येईल. फेसबुकवर एबीपी माझाची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही दिवसभर पाहू शकता. शिवाय ट्विटरवरही क्षणाक्षणाची अपडेट मिळेल. फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - @abpmajhatv यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझावर दिवसभर महाकव्हरेज एबीपी माझाच्या वेबसाईटसह चॅनलवरही तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणीचे अपडेट पाहू शकता. एबीपी माझाच्या स्टुडिओतून राजकीय विश्लेषक आणि सर्वपक्षीय नेत्यांसह या निवडणुकीचं विश्लेषण केलं जाईल. निवडणुकीतील समीकरणं, जातीय गणितं, विजय आणि पराभवाची कारणं या सर्व मुद्द्यांवर दिवसभर सर्वपक्षीय नेते आणि राजकीय विश्लेषकांसोबत निकालावर चर्चा केली जाईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र
राजकारण






















