एक्स्प्लोर

फक्त एक फोन करा अन् तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवा; जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया

Chief Minister Medical Assistance Fund: आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक योजनेची अतिशय सोयीची होणार आहे.

Chief Minister Medical Assistance Fund: शिंदे-फडणवीस सरकारनं राज्यातील गरजू नागरिकांना आजारपणातील उपचारासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. तसेच, अर्ज करण्याची किचकट प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे. 

वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जाणार आहे. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षानं आता नवा उपक्रम जाहीर केला आहे. नव्या उपक्रमानुसार नागरिकांसाठी ही मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज (विहीत नमुन्यात)
  • वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
  • तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे.)
  • रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  • रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  • संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
  • अपघात असल्यास, FIR असणे आवश्यक आहे.
  • अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे

1. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)
2. हृदय प्रत्यारोपण
3. यकृत प्रत्यारोपण
4. किडणी प्रत्यारोपण
5. बोन मॅरो प्रत्यारोपण
6. फुफ्फुस प्रत्यारोपण
7. हाताचे प्रत्यारोपण
8. हिप रिप्लेसमेंट
9. कर्करोग शस्त्रक्रिया
10. अपघात शस्त्रक्रिया
11. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
12. मेंदूचे आजार
13. हृदयरोग
14. डायलिसिस 
15. अपघात
16. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
17. नवजात शिशुंचे आजार
18. गुडघ्याचे प्रत्यारोपण 
19. बर्न रुग्ण
20. विद्युत अपघात रुग्ण

अर्थसहाय्याची मागणी या ई-मेलव्दारे  aao.cmrf-mh@gov.in केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत. उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. संपर्क क्र. 022-22026948 सविस्तर माहिती व रुग्णालयाची यादी वेबसाईटवर आहे. (cmrf.maharashtra.gov.in)

इतर महत्वाच्या बातम्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget