एक्स्प्लोर

Maharashtra Political Rallies: साखळी सभांकरता पैसा येतो कुठून? राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगानं हिशोब मागण्याची मागणी

Maharashtra Political Rally:  राजकीय पक्षांना मोठमोठ्या सभांसाठी निधी कुठून मिळतो, याची चौकशी करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

Maharashtra Politics:  राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) पुन्हा युतीचं सरकार आणल्यानंतर एकनाथ शिंदे (शिवसेना) आणि सध्या विरोधकांच्या भूमिकेत महाविकास आघाडी ज्यात खासकरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) अनेक सभा महाराष्ट्रात होऊ लागल्या आहेत. या सभांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात येतोय. मात्र त्यासाठी पैसे आले कुठुन? याबाबत महाराष्ट्रातील सर्व पक्षांकडून निवडणुक आयोगानं (Election Commission) हिशोब मागावा अशी मागणी करत तशी लेखी तक्रार इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्य निवडणूक आगोगाला केली आहे.

या पत्रात त्यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना सध्या निवडणुक आयोगानं मोकळं सोडलेलं आहे. मुळात या सर्व पक्षांवर राज्य निवडणुक आयोगाचं नियंत्रण असायला हवं होत. मात्र, तसं होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे अवकाळीचं संकट आहे, उभी पिकं आडवी झालीत. नुकसानभरपाईचे पंचनामे रखडलेत, काही ठिकाणी पंचनामे होऊनही अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना अश्या मोठमोठ्या जाहीर सभांना मात्र ऊत आला आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळी दररोज एकमेकांवर आरोप प्रतिआरोप करुन आपआपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्यांना राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं काही देणघेणंच उरलेलं नाही. बेरोजगारी व महागाई बाबतीत कुणीही बोलत नाही. फक्त दुसऱ्याचा पक्ष फोडून आपलाच पक्ष कसा वाढेल? आपल्याच पक्षाला कशी प्रसिद्धी मिळेल? याचाच खटाटोप सर्वांचा सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले. 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत, एनसीपीचे अजित पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ही नेते मंडळी या आरोप प्रत्यारोपांत आघाडीवर असल्याचा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे. ही सारी मंडळी आपली राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न करताना जनतेला, सर्व सामान्य माणसाच्या अडचणींना आणि मुळात अडचणीत असणाऱ्या शेतकरी राजालाही विसरलेत. त्यामुळे या सभांचा सिलसिला थांबवून निवडणुक आयोगानं या सर्व राजकीय पक्षांकडून हिशोब मागत या साखळी सभांसाठी पैसे आले कुठुन? व ते गेले कुठे? याचा जाब विचारत याबाबतीत सखोल चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे हेमंट पाटील यांनी म्हटले. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघातात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघातात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget