एक्स्प्लोर
Advertisement
एक जून ते 31 जुलै.. राज्यात किती पाऊस पडला?
एक जून ते 31 जुलै या काळात देशात सरासरीच्या सहा टक्के कमी पाऊस पडला. राज्यात या दोन महिन्यात सरासरी 543.8 मिमी पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्षात 613.8 मिलीमीटर म्हणजेत 13 टक्के जास्त पाऊस पडला.
मुंबई : पावसाळ्याचे दोन महिने संपले. दमदार पाऊस मग चिंता वाढवणारा खंड असे चढउतार पाहायला मिळाले. राज्याच्या काही भागात चिंताजनक चित्र असलं तरी आकड्यांच्या खेळात कागदोपत्री मात्र सर्व काही आलबेल आहे. औरंगाबाद, जालना, सांगली, नंदुरबार आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 22 ते 30 टक्के कमी पाऊस झाला आहे.
एक जून ते 31 जुलै या काळात देशात सरासरीच्या सहा टक्के कमी पाऊस पडला. राज्यात या दोन महिन्यात सरासरी 543.8 मिमी पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्षात 613.8 मिलीमीटर म्हणजेत 13 टक्के जास्त पाऊस पडला.
विभागनिहाय पडलेला पाऊस (एक जून ते 31 जुलै)
- कोकण आणि गोव्यात सरासरी 1 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात आत्तापर्यंत 2219.7 मिमी म्हणजेच सरासरीच्या 23 टक्के जास्त पाऊस पडलाय.
- मध्य महाराष्ट्रात या काळात सरासरी 8 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात 428.9 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 11 टक्के जास्त पाऊस पडला.
- मराठवाड्यात सरासरी 5 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात 301.1 मिमी म्हणजे सरासरीच्या 9 टक्के कमी पाऊस पडला.
- विदर्भात सरासरी9 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात 533.4 मिमी म्हणजेच सरासरीच्या 11 टक्के जास्त पाऊस पडला.
- राज्यातील कुठल्याच तालुक्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला नाही.
- 11 तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस झाला.
- 93 तालुक्यात सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झाला.
- 112 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस झाला.
- 137 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement